मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  कंडिशनर लावल्याने का गळतात केस? जाणून घ्या ५ कारणं

कंडिशनर लावल्याने का गळतात केस? जाणून घ्या ५ कारणं

Sep 30, 2022, 07:35 PM IST

    • हेअरवॉश स्टेपमध्ये कंडिशनर वापरणे खूप महत्वाचे आहे. कंडिशनर तुमचे केस रेशमी बनवते. पण यामुळे केस का गळतात, ते जाणून घ्या.
केसांवर कंडिशनर वापरताना या चुका करु नका

हेअरवॉश स्टेपमध्ये कंडिशनर वापरणे खूप महत्वाचे आहे. कंडिशनर तुमचे केस रेशमी बनवते. पण यामुळे केस का गळतात, ते जाणून घ्या.

    • हेअरवॉश स्टेपमध्ये कंडिशनर वापरणे खूप महत्वाचे आहे. कंडिशनर तुमचे केस रेशमी बनवते. पण यामुळे केस का गळतात, ते जाणून घ्या.

Hair Fall After Using Conditioner : केस मजबूत करण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा केस धुण्याचा सल्ला दिला जाते. दुसरीकडे, जर तुमचे स्काल्प ऑइली असेल तर तुम्ही आठवड्यातून तीनदा केस धुवावेत. हेअरवॉश स्टेपमध्ये कंडिशनर वापरणे देखील खूप महत्वाचे आहे. कंडिशनर तुमचे केस रेशमी बनवते. यासोबत केसांना पोषणही मिळते. मात्र कंडिशनरच्या वापरामुळे केस गळण्याची तक्रार अनेक जण करतात. अशा वेळी ते कंडिशनर लावणे बंद करतात. तर असे केल्याने तुमच्या केसांच्या समस्या वाढू शकतात. कंडिशनरमुळे केस गळण्याची काही कारणे असू शकतात. चला जाणून घेऊया-

ट्रेंडिंग न्यूज

Mother's Day Recipe: आईसाठी बनवा टेस्टी रव्याचे पॉकेट्स, झटपट तयार होते ही रेसिपी

Menopause Journey: रजोनिवृत्तीचा करा एकत्र स्वीकार, जाणून घ्या या नव्या पर्वातून कपलने कसा काढावा मार्ग

Cake Baking Tips: घरी बनवलेला केक खराब होतो का? परफेक्ट बेकिंगसाठी फॉलो करा या टिप्स

Lungs Infection: सर्दी आणि खोकला बनू शकतात फुफ्फुसाच्या संसर्गाचे कारण, या लक्षणांवरून ओळखा

स्काल्पमध्ये कंडिशनर

कधीही स्काल्पवर कंडिशनर लावू नये. स्काल्पला कंडिशनर लावल्यास केस लवकर गळू शकतात. नेहमी केसांच्या मिड लेंथपासून खालच्या दिशेने कंडिशनर लावा.

जास्त कंडिशनर वापरणे

कंडिशनरचे प्रमाण आपल्या केसांनुसार वापरावे. पण जर तुम्ही जास्त कंडिशनर वापरल्यास केस स्वच्छ होण्यास बराच वेळ लागतो. जास्त कंडिशनर वापरल्याने केस गळतात.

कंडिशनर नीट न धुणे

कंडिशनर वापरल्यानंतर जर तुम्ही कंडिशनर नीट धुतले नाही तर तुमच्या केसांमध्ये काही प्रमाणात कंडिशनर अडकतो. ज्यामुळे केस कमकुवत होतात आणि केस गळू लागतात.

ऑइली स्काल्प

जर तुमचे स्काल्प तेलकट असेल तर तुमचे केस लवकर गळण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, प्रत्येक वेळी केस धुताना कंडिशनर वापरू नका. आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा कंडिशनर वापरू नका.

जास्त केमिकल्स असलेले कंडिशनर

कंडिशनरमध्ये केमिकल्स असतात. पण जर तुमच्या कंडिशनरमध्ये जास्त हानिकारक रसायने असतील तर ते तुमचे केस गळण्याची समस्या वाढवू शकते. अशावेळी केमिकल फ्री कंडिशनर वापरा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग