मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Lungs Infection: सर्दी आणि खोकला बनू शकतात फुफ्फुसाच्या संसर्गाचे कारण, या लक्षणांवरून ओळखा

Lungs Infection: सर्दी आणि खोकला बनू शकतात फुफ्फुसाच्या संसर्गाचे कारण, या लक्षणांवरून ओळखा

May 09, 2024, 08:04 PM IST

    • Lungs Infection Symptoms: शरीराच्या इतर भागांप्रमाणेच फुफ्फुसांचेही निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला वारंवार खोकला येत असेल तर यामुळे देखील समस्या उद्भवू शकतात. फुफ्फुसाच्या संसर्गाची लक्षणे येथे जाणून घ्या.
फुफ्फुसाच्या संसर्गाचे लक्षणं (freepik)

Lungs Infection Symptoms: शरीराच्या इतर भागांप्रमाणेच फुफ्फुसांचेही निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला वारंवार खोकला येत असेल तर यामुळे देखील समस्या उद्भवू शकतात. फुफ्फुसाच्या संसर्गाची लक्षणे येथे जाणून घ्या.

    • Lungs Infection Symptoms: शरीराच्या इतर भागांप्रमाणेच फुफ्फुसांचेही निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला वारंवार खोकला येत असेल तर यामुळे देखील समस्या उद्भवू शकतात. फुफ्फुसाच्या संसर्गाची लक्षणे येथे जाणून घ्या.

Common Symptoms of Lungs Infection: बहुतेक लोकांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. पण ही समस्या वारंवार होत असेल तर फुफ्फुसात संसर्ग होण्याचेही कारण असू शकते. फुफ्फुस हा शरीरातील सर्वात नाजूक आणि आवश्यक अवयवांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत जेव्हा संसर्ग होतो तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत ही लक्षणे वेळेत ओळखणे महत्वाचे आहे, जेणेकरून उपचार केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या फुफ्फुसाच्या संसर्गाची काही लक्षणे.

ट्रेंडिंग न्यूज

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

फुफ्फुसाच्या संसर्गाची लक्षणे

छातीत दुखणे

छातीत तीव्र वेदना होत असल्यास ते फुफ्फुसाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. खोकताना किंवा दीर्घ श्वास घेताना छातीत दुखणे वाढते. याशिवाय कधी कधी तुम्हाला तुमच्या पाठीच्या वरच्या भागात तीव्र वेदना जाणवू शकतात.

ताप

जेव्हा तुमचे शरीर संसर्गाशी लढण्याचा प्रयत्न करते तेव्हा ताप येतो. फुफ्फुसात संसर्ग झाल्यास तुमचा ताप झपाट्याने वाढू शकतो. तथापि ताप हे इतर काही आजाराचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे घाबरून न जाता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

शरीरातील वेदना

फुफ्फुसाच्या संसर्गामुळे तुमच्या स्नायूंमध्ये आणि पाठीत वेदना होऊ शकतात. याशिवाय काही वेळा तुमच्या स्नायूंना सूज येऊ शकते.

वाहणारे नाक

तसं तर वाहणारे नाक हे इतर फ्लू सारख्या समस्यांचे लक्षण असू शकते. त्याचबरोबर कफामुळे अनेकदा इन्फेक्शन होऊन नाक वाहण्याची समस्या उद्भवते.

खोकला किंवा सर्दी

घट्ट कफ असलेला खोकला आणि सर्दी हे संसर्गाचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत कफच्या रंगाकडे लक्ष द्या.

श्वास घेण्यात अडचण

संसर्ग झालेल्या लोकांना श्वास घेणे कठीण होऊ शकते. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

थकवा

जेव्हा तुमचे शरीर एखाद्या संसर्गाशी लढत असते, तेव्हा तुम्हाला सुस्त आणि थकवा जाणवू शकतो. या काळात विश्रांती आवश्यक आहे.

घरघर

जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा तुम्हाला घरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिट्टीचा आवाज ऐकू येतो. हे अरुंद वायुमार्ग किंवा सूज आल्यामुळे होते.

त्वचा किंवा ओठ निळे होणे

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तुमचे ओठ किंवा नखे हलके निळे दिसू लागतात.

तुमच्या फुफ्फुसात कर्कश आवाज किंवा घरघर आवाज येणे

फुफ्फुसाच्या संसर्गादरम्यान बहुतेक लोकांच्या छातीत कर्कश आवाज विकसित होऊ शकतात, ज्याला बिबेसिलर क्रॅकल्स देखील म्हणतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या