मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  ऑइली स्काल्पसाठी फायदेशीर आहे होममेड प्री-कंडिशनर, केसांना मिळेल नॅचरल केराटिन

ऑइली स्काल्पसाठी फायदेशीर आहे होममेड प्री-कंडिशनर, केसांना मिळेल नॅचरल केराटिन

Sep 17, 2022, 01:59 PM IST

    • Homemade Hair Conditioners : बर्‍याच लोकांना ऑइली स्काल्पची समस्या असते. त्यामुळे कंडिशनर त्यांना सूट होत नाही. याच्या वापरामुळे केस गळायला लागतात. अशा परिस्थितीत, घरगुती प्री-कंडिशनर हा सर्वोत्तम उपाय आहे.
होममेड प्री-कंडिशनर

Homemade Hair Conditioners : बर्‍याच लोकांना ऑइली स्काल्पची समस्या असते. त्यामुळे कंडिशनर त्यांना सूट होत नाही. याच्या वापरामुळे केस गळायला लागतात. अशा परिस्थितीत, घरगुती प्री-कंडिशनर हा सर्वोत्तम उपाय आहे.

    • Homemade Hair Conditioners : बर्‍याच लोकांना ऑइली स्काल्पची समस्या असते. त्यामुळे कंडिशनर त्यांना सूट होत नाही. याच्या वापरामुळे केस गळायला लागतात. अशा परिस्थितीत, घरगुती प्री-कंडिशनर हा सर्वोत्तम उपाय आहे.

Homemade Pre-Conditioner for Healthy And Silky Hair : केस निरोगी ठेवण्यासाठी सामान्यतः शॅम्पूनंतर कंडिशनर लावण्याचा सल्ला दिला जातो. पण बऱ्यात लोकांचे स्काल्प इतके तेलकटअसते की कंडिशनर त्यांना सूट होत नाही. कंडिशनर लावल्यानंतर हेअर फॉल सुरू होते. अशा स्थितीत कंडिशनर स्किप करण्यातच ते स्वतःचे भले मानतात. जर तुम्हाला कंडिशनरची हीच समस्या असेल तर तुम्ही होममेड प्री-कंडिशनर वापरून पाहू शकता. यामुळे तुमच्या केसांना पोषणही मिळेल आणि केस गळण्याची समस्याही होणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Litchi Shake: उन्हाळ्यात काही खास प्यावेसे वाटत असेल तर बनवा लिची शेक, खूप सोपी आहे रेसिपी

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

दही आणि एलोवेरा जेल

तुम्ही दही आणि एलोवेरा जेल मिक्स करून प्री-कंडिशनर बनवू शकता. यासाठी तुम्हाला अर्धा वाटी दही घ्यायचे आहे आणि त्यात तीन चमचे एलोवेरा जेल मिक्स करावे लागेल. आता ते चांगले मिक्स करुन केसांना लावा. साधारण २० मिनिटांनंतर शॅम्पू करा.

भात आणि दही

शिजवलेला भात आणि दही यापासून देखील प्री-कंडिशनर बनवता येते. दोन चमचे शिजवलेला भात मिक्सरमध्ये टाकायचा आहे. बारीक केल्यानंतर त्यात अर्धी वाटी दही मिक्स करा. आता हे केसांना लावा. अप्लाय केल्यानंतर २० मिनिटांनी स्वच्छ धुवा.

नारळाचे दूध आणि केळी

तुम्हाला ६-७ चमचे नारळाचे दूध घ्यावे लागेल. नंतर मिक्सरच्या भांड्यात केळी टाकून मॅश करा. दोन्ही गोष्टी एकत्र करून मिश्रण तयार करा आणि केसांना लावल्यानंतर १५ मिनिटांनी धुवा.

दही आणि अंडे

जर तुम्ही केसांमध्ये अंडे लावू शकत असाल तर तुम्हाला एक अंड्याचा पांढरा भाग घ्यावा लागेल. ते दह्यात मिक्स करा. यानंतर अर्धा तास केसांमध्ये ठेवा. नंतर शैम्पूने धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या