मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Wistron Tata : 'विस्ट्रॉन'वर आता टाटा समूहात येण्याची शक्यता, आयफोन १५ चे उत्पादन भारतातूनच

Wistron Tata : 'विस्ट्रॉन'वर आता टाटा समूहात येण्याची शक्यता, आयफोन १५ चे उत्पादन भारतातूनच

Apr 10, 2023, 09:56 PM IST

    • Wistron Tata : अॅपल या कंपनीचे आयफोन बनविणाऱ्या 'विस्ट्रॉन'चा बंगळुरू येथील कारखाना टाटा उद्योगसमुहाच्या ताब्यात लवकरच येणार आहे. 'अॅपल'ची उत्पादने भारतात, भारतीय कंपनीद्वारे बनविण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल.
tata group HT

Wistron Tata : अॅपल या कंपनीचे आयफोन बनविणाऱ्या 'विस्ट्रॉन'चा बंगळुरू येथील कारखाना टाटा उद्योगसमुहाच्या ताब्यात लवकरच येणार आहे. 'अॅपल'ची उत्पादने भारतात, भारतीय कंपनीद्वारे बनविण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल.

    • Wistron Tata : अॅपल या कंपनीचे आयफोन बनविणाऱ्या 'विस्ट्रॉन'चा बंगळुरू येथील कारखाना टाटा उद्योगसमुहाच्या ताब्यात लवकरच येणार आहे. 'अॅपल'ची उत्पादने भारतात, भारतीय कंपनीद्वारे बनविण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल.

Wistron Tata : अॅपल या कंपनीचे आयफोन बनविणाऱ्या 'विस्ट्रॉन'चा बंगळुरू येथील कारखाना टाटा उद्योगसमुहाच्या ताब्यात लवकरच येणार आहे. 'अॅपल'ची उत्पादने भारतात, भारतीय कंपनीद्वारे बनविण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल.

ट्रेंडिंग न्यूज

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

Business Ideas : कर्ज हे नेहमीच वाईट नसतं; 'मसाला किंग' धनंजय दातार सांगतायत स्वानुभव

एका वृत्तानुसार, टाटा समुहाने या कारखान्यामध्ये आधीच संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. या टेकओव्हर प्रक्रियेचा एक भाग म्हणून कारखान्यातील सुमारे दोन हजार कामगार कमी करण्यात येतील, अशी शक्यता आहे. त्यात मध्यम-स्तरीय कर्मचाऱ्यांची संख्या ४०० इतकी असेल. तसेच, सुमारे चार ते पाच वरिष्ठ पातळीवरील अधिकारी बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत आहेत किंवा त्यांना जाण्यास सांगण्यात आले आहे.

'विस्ट्रॉन'चा कारखाना टेकओव्हर केल्यानंतर, टाटा समूह 'आयफोन-१५' बनवण्यास सुरुवात करेल. सध्या, 'विस्ट्रॉन'च्या या भारतीय कारखान्यात आठ उत्पादन लाइन्स असून तेथे 'आयफोन-१२' व 'आयफोन-१४' हे फोन बनविण्यात येत आहेेत.

टाटांनी बंगळुरूचा कारखाना ताब्यात घेतल्यानंतर विस्ट्रॉन भारतीय बाजारपेठेतून पूर्णपणे बाहेर पडेल, कारण भारतात अॅपल उत्पादनांचे उत्पादन करणारा हा तिचा एकमेव कारखाना होता.

अॅपल उत्पादनांसाठी भारताची बाजारपेठ अंदाजे ६०० दशलक्ष डॉलर इतकी आहे. अॅपल चीनमधून बाहेर पडण्याची योजना आखत असताना उत्पादनासाठी भारताकडे लक्ष देत आहे.

गेल्या वर्षी, कॅलिफोर्नियातील क्युरटिनो या कंपनीने चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्षांमुळे जगभरातील सुमारे २५ टक्के उत्पादन भारतात हलवण्याची आपली योजना जाहीर केली होती.

विस्ट्रॉन, पेगाट्रॉन आणि फॉक्सकॉन या तीन तैवानच्या कंपन्या भारतात अॅपलची उत्पादने बनवितात. त्यांपैकी विस्ट्रॉन भारत सोडत आहे, तर फॉक्सकॉन आणि पेगट्रॉन यांनी भारतात उत्पादन वाढवले आहे. टाटा 'आयफोन'साठी 'पेगट्रॉन'चे कारखाने विकत घेईल अशीही एक अटकळ आहे.

विभाग