मराठी बातम्या  /  बिझनेस  /  NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

May 06, 2024, 07:41 PM IST

  • NBFC FD Rates : किंचित जोखीम घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला एफडीवरही उत्तम व्याज मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला बँकांऐवजी एनबीएफसीचा पर्याय निवडावा लागेल.

Non-banking financial corporations (NBFCs) offer higher interest rates in comparison to banks

NBFC FD Rates : किंचित जोखीम घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला एफडीवरही उत्तम व्याज मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला बँकांऐवजी एनबीएफसीचा पर्याय निवडावा लागेल.

  • NBFC FD Rates : किंचित जोखीम घेण्याची तयारी असेल तर तुम्हाला एफडीवरही उत्तम व्याज मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला बँकांऐवजी एनबीएफसीचा पर्याय निवडावा लागेल.

NBFC FD Rates : फिक्सड डिपॉझिट (Fixed Deposits) अर्थात मुदत ठेव ही आजही सर्वसामान्यांसाठी भरवशाची गुंतवणूक आहे. गुंतवणुकीचे नवनवे पर्याय उपलब्ध असतानाही एफडीतील गुंतवणूक कमी झालेली नाही. एफडीवरील व्याज बँक आणि वित्तीय संस्थेनुसार बदलत असते. जोखीम घेण्याची क्षमता असल्यास बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) उत्तम पर्याय ठरू शकतात. सध्या आघाडीच्या पाच वित्तीय कंपन्या एफडीवर ७ टक्क्यांपेक्षाही अधिक व्याज देत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

सात टक्क्यांहून अधिक व्याज देणाऱ्या बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या  

बजाज फिनसर्व्ह

ही कंपनी विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे १८, २२, ३३ आणि ४४ महिन्यांवर जास्त व्याज दर देते. हा व्याजदर वार्षिक ७.४० टक्के ते ८.२५ टक्के इतका आहे. १८ महिन्यांच्या एफडीवर ७.८ टक्के व्याज मिळते. २२ महिन्यांच्या एफडीवर ७.९ टक्के व्याज मिळते. ३३ महिन्यांच्या एफडीवर व्याजदर ८.१० टक्के आणि ४४ महिन्यांच्या एफडीवर जास्तीत जास्त ८.२५ टक्के व्याज दिले जाते.

कालावधी (महिन्यांमध्ये)व्याजदर (%)
१८७.८०
२२                  ७.९०
३३                   ८.१०
४४                   ८.२५

(वरील तक्ता विशेष कालावधीच्या एफडीचा संदर्भ देतो)

कालावधी (महिन्यांमध्ये)व्याजदर (टक्के)
१२-१४७.४०
१५-२३७.५०
२४-३५ ७.८०
३६-६०    ८.१०

(स्त्रोत : bajajfinserv.in; रेग्युलर पीरियड)

मुथूट कॅपिटल

मुथूट कॅपिटल वर्षाला ७.४५ ते ८.५ टक्के व्याज देते. एका वर्षासाठी ही कंपनी ७.४५ टक्के, १५ महिन्यांसाठी ८.५ टक्के, दोन वर्षांसाठी ८ टक्के आणि तीन वर्षांसाठी ८.५ टक्के आणि पाच वर्षांसाठी ७.५ टक्के व्याज देते. (स्त्रोत : muthootcap.com)

श्रीराम फायनान्स

श्रीराम फायनान्स वर्षाला ७.८५ ते ८.८ टक्के व्याज देते. एक वर्षाच्या एफडीवर ही कंपनी ७.८५ टक्के व्याज देते. दोन वर्षांच्या एफडीवर ८.१५ टक्के आणि ३ वर्षांच्या एफडीवर ८.७० टक्के व्याज मिळते. पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर जास्तीत जास्त ८.८० टक्के व्याज दिलं जातं. (स्त्रोत : shriramfinance.in)

महिंद्रा फायनान्स

महिंद्रा फायनान्स मुदत ठेवींवर ७.७५ ते ८.०५ टक्क्यांपर्यंत व्याज देते. १५ महिन्यांच्या कालावधीसाठी ७.७५ टक्के, ३० महिन्यांसाठी ७.९ टक्के आणि ४२ महिन्यांसाठी ८.०५ टक्के व्याज दिलं जातं.

कालावधी (महिन्यांत)व्याजदर (टक्के)
१५७.७५
३०७.९
४२८.०५

(स्त्रोत : mahindrafinance.com)

आयसीआयसीआय होम फायनान्स

ही एनबीएफसी ७.२५ ते ७.६५ टक्क्यांपर्यंत व्याज देते. १२ ते २४ महिन्यांच्या मुदत ठेवीवर ७.२५ टक्के व्याज मिळते. २४ ते ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी त्यापेक्षा किंचित अधिक म्हणजे ७.५५ टक्के व्याज मिळते.

महिनेव्याजदर (टक्के)
१२-२४           ७.२५
२४-३६            ७.५५
३६-६०             ७.६५
६०-७२७.६०
७२-१२०       ७.५०

(icicihfc.com; नॉन संचयी ठेवी)

३६ ते ६० महिन्यांच्या मुदतीच्या ठेवींवर व्याजदर ७.६५ टक्के असतो. मात्र, मुदत ठेवीचा कालावाधी ६० महिन्यांच्या पुढं गेल्यावर व्याज कमी होते. ७२ ते १२० महिन्यांच्या मुदतीच्या एफडीवर ७.५० टक्के व्याज दर आहे.

पुढील बातम्या