ITR News: आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकर खात्याने आयटीआर(ITR) भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आयटीआयार भरण्यापूर्वी नगिरकांनी तयारीत असणे गरजेचे आहे. तसेच योग्य प्रकारे कर भरणा आणि आयटीआर कसा फाइल करावा या बाबत देखील आर्थिक तज्ज्ञ सल्ला देत असतात. तुमचे सर्व व्यवहार आणि कर कपात फॉर्म-१६, एआयएस आणि फॉर्म २६एएस जुळवावा लागणार आहे. पगारदार कर्मचाऱ्यांना या महिन्यात फॉर्म-१६ मिळणार असून या नंतर त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागणार आहे. मात्र, हा करभरणा करतानांना काही गोष्टी पाळल्या नाही तर आयकर विभागाची घेत नोटीस मिळू शकते. त्यामुळे थोडी खबरदारी घेतल्यास करदाते आयकर विभागाच्या नोटीस टाळू शकतात.
१. जर तुम्ही अजून पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर आधी हे काम पूर्ण करा.
२. तुम्हाला वेळेवर पूर्ण आयकर परतावा मिळवायचा असेल तर तुमचा मोबाईल आणि पॅन नंबर तुमच्या बँकेत अपडेट आहे की नाही याची खात्री करा. यात जर त्रुटी असेल तर केवायसी साठी बँकेत जाऊन योग प्रक्रिया पूर्ण करा.
१. चुकीची वैयक्तिक माहिती: आयटीआर फॉर्म भरताना, करदात्यांनी त्यांचे नाव, पॅन, पत्ता आणि बँक खात्याचे तपशील योग्य आहे की नाही याची खात्री करावी. तसेच त्यांची वैयक्तिक माहिती फॉर्ममध्ये योग्यरित्या भरली आहे की नाही हे देखील तपासायला हवे.
२. चुकीचा आयटीआर अर्ज भरणे करदात्याने उत्पन्नाचा स्रोत आणि उत्पन्नाच्या प्रकारानुसार योग्य ITR फॉर्म निवडणे महत्त्वाचे आहे. चुकीचा फॉर्म भरल्याने नोटीस आणि दंड भरावा लागू शकतो.
३. उत्पन्नाविषयी संपूर्ण माहिती न देणे: पगार, व्याज उत्पन्न, भाड्याचे उत्पन्न, भांडवली नफा यासह सर्व प्रकारच्या स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती आयटीआरमध्ये देणे बांधनकरण आहे. या बद्दल माहिती लपविल्यास करचुकवेगिरीसाठी दंड होऊ शकतो.
५ . TDS दुर्लक्षित करणे: नियोक्ता किंवा कपात करणाऱ्याने दिलेला फॉर्म १६ आणि १६ ए मधील TDS चे तपशील ITR मध्ये मांडणे आवश्यक आहे. योग्य TDS माहिती दिली नाही तर संबंधित व्यक्तीला दंड होऊ शकतो.
५. गुंतवणूक आणि कपातीची अपूर्ण माहिती आयकर कायद्याच्या कलम ८०C, ८०D, ८०G अंतर्गत पात्र कर लाभांचा दावा करण्यासाठी सर्व गुंतवणूक, खर्च आणि वजावट योग्यरित्या सादर करावी. असे न केल्यास व्यक्तीवर कर दायित्व वाढू शकते.
६. व्याजाचे उत्पन्न लपवणे: करदात्याने बचत खाते, एफडी किंवा इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या व्याजाची योग्य माहिती दिली पाहिजे. व्याजाचे उत्पन्न जाहीर करणे सर्वांना बंधनकारक आहे.
७. फॉर्म-२६एएस जुळत नाही: ITR मध्ये भरलेल्या सर्व तपशीलांची वार्षिक माहिती, बँक स्टेटमेंट, स्टेटमेंटऑफ अकाउंट (AIS) आणि फॉर्म २६एएस शी जुळले पाहिजे. एआयएस ॲप डाउनलोड करून हे करता येते. त्यात तुमच्या आयकर संबंधित माहितीचा तपशील असतो.
८. वेळेवर आयटीआयार न भरणे: आयटीआर भरण्याची शेवटची तारीख तुमच्या कर ब्रॅकेटवर अवलंबून असते. हे नियम देशानुसार बदलू शकते, म्हणून ते योग्यरित्या तपासने गरजेचे आहे. आयटीआर उशीरा भरल्यास दंड होऊ शकतो.
९. आयटीआर सत्यापित न करणे: आयटीआयार ऑनलाइन भरल्यानंतर, ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ओटीपी किंवा नेट बँकिंगद्वारे) पडताळणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
१०. आवश्यक नोंदी न ठेवणे सर्व कागदपत्रे, पावत्या आणि उत्पन्न, गुंतवणूक आणि कर कपातीशी संबंधित पुरावे यांची नोंद ठेवा. हे पडताळणीसाठी किंवा भविष्यात कोणत्याही कर तपासणीच्या बाबतीत आवश्यक असू शकते.