मराठी बातम्या  /  बिझनेस  /  WhatsApp News : व्हॉट्सॲपचं रंग, रूप बदललं! नव्या बटणांनी दिला आकर्षक लुक, तुम्ही पाहिला का?

WhatsApp News : व्हॉट्सॲपचं रंग, रूप बदललं! नव्या बटणांनी दिला आकर्षक लुक, तुम्ही पाहिला का?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 06, 2024 09:37 AM IST

WhatsApp news update: व्हॉट्सॲपच्या नव्या इंटरफेसमध्ये हिरव्या रंगाच्या थीमसह आधुनिक आयकॉन देण्यात आले आहे. ॲप स्टोअरवर हे नवे अपडेट उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲपच रंग, रूप बदललं! नव्या बटणांनी दिला आकर्षक लुक, व्हिडिओ कॉलिंगसाठीही खास फीचर; वाचा
व्हॉट्सॲपच रंग, रूप बदललं! नव्या बटणांनी दिला आकर्षक लुक, व्हिडिओ कॉलिंगसाठीही खास फीचर; वाचा

WhatsApp news : व्हॉट्सॲपने यूझर्सचा चॅटिंग अनुभव आणखी चांगला करण्यासाठी नवनवीन अपडेट आणत आहे. या मालिकेत कंपनीने व्हॉट्सॲप ग्रीन इंटरफेस आणण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सॲप ग्रीनबद्दल गेल्या काही आठवड्यापासून बातम्या येत होत्या. आता कंपनीने नवे अपडेट यूझर्ससाठी आणले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News : मुलींच्या घामापासून तयार होतो भात! खवय्ये आवडीने मारताये ताव! कुठे मिळते ही विचित्र डिश ?, वाचा

WABetaInfo ने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपसाठी नवी इंटरफेस ओएस २४.९.४ मध्ये आणले आहे. व्हॉट्सॲपच्या नव्या इंटरफेसमध्ये हिरव्या रंगाच्या थीमसह आधुनिक आयकॉन देण्यात आले आहे. ॲप स्टोअरवर व्हॉट्सॲपचे ने नवे अपडेट देण्यात आले आहे. या नव्या अपडेटमध्ये कंपनीने व्हिडिओ कॉलिंग दरम्यान स्क्रीन शेअरिंगसाठी ऑडिओ सपोर्टची सुविधा देखील दिली आहे.

ITR भरतांना 'या'; चूका करणे पडेल महागात! हातात पडेल नोटीस अन् भरावा लागेल दंड; वाचा

आयओएस २३.१५.१०.७२ साठी व्हॉट्सॲप बिटामध्ये हे फिचर पहिल्यांदा लॉंच करण्यात आले. व्हॉट्सॲपच्या नवीन इंटरफेसमध्ये तुम्हाला नवीन चित्रे आणि हिरवी बटणे पाहायला मिळतील. कंपनी बऱ्याच काळापासून बीटा आवृत्तीत नव्या अपडेटची चाचणी करत होती. फीडबॅकच्या आधारे हे अपडेट सुधारण्यात येत होते. आता व्हॉट्सॲपची ही या प्रकारातील अंतिम आवृत्ती वापरकर्त्यांसाठी सज्ज झाली आहे. नवीन अपडेटमध्ये दिलेले रिफ्रेश व्हिज्युअल एलिमेंट्स युजर्सना आवडतील अशी कंपनीला अपेक्षा आहे. कंपनी हळूहळू हे अपडेट आणत असून पुढील काही दिवसात ते सर्व आयओएस यूझर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Pune Lohagav News : धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुप्तांगावर लागला बॉल; ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

Android वापरकर्त्यांसाठी स्टेटस अपडेट्सचे नवे इंटरफेस उपडेट देण्यात आले आहे. व्हॉट्सॲपने Android वापरकर्त्यांसाठी स्टेटस अपडेट्स ट्रेचे नवे फीचर आणले आहे. WABetaInfo ने एका एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये या अपडेटची माहिती देण्यात आली आहे. WABetaInfo नुसार, नवीन स्टेटस अपडेट बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. जर तुम्ही बीटा वापरकर्ता असाल, तर तुम्ही ते Android २.२४.१०.१० अपडेटसाठी व्हॉट्सॲप बीटामध्ये आहे की नाही याची खात्री करू शकता. जागतिक वापरकर्त्यांना स्टेटस अपडेटचा सध्याचा इंटरफेस फारसा आवडलेला नाही आणि म्हणूनच कंपनीने त्याचे डिझाइन पुन्हा बदलले आहे.

WhatsApp channel

विभाग