मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Apple store : 'हॅलो मुंबई' म्हणत अॅपलचे पहिले रिटेल स्टोअर मुंबईत दिमाखात सुरु, पहा खासियत

Apple store : 'हॅलो मुंबई' म्हणत अॅपलचे पहिले रिटेल स्टोअर मुंबईत दिमाखात सुरु, पहा खासियत

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 05, 2023 05:24 PM IST

Apple store : अॅपलचे फ्लॅगशिप रिटेल स्टोअर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये अॅपल बीकेसी नावाने सुरू झाले आहे.

Apple BKC store in Mumbai HT
Apple BKC store in Mumbai HT

Apple store : जगातील आघाडीची टेक कंपनी अॅपलने मुंबईत बीकेसीमध्ये आपले पहिले अॅपल स्टोअरचे नुकतेच दिमाखात सुरु केले. या स्टोअरला अॅपल बीकेसी असे नाव देण्यात आले आहे.

अॅपल इंडिया स्टोअरच्या वेबसाईटवरही यासंबंधीचा एक टिझर जारी करण्यात आला आहे. अॅपलने आपल्या भारतातील पहिल्या रिटेल स्टोअरचे बॅनर जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल मुंबई येथे लावले आहे. अॅपलनेही वेबसाइटवर लिहिले आहे, "हॅलो मुंबई! आम्ही भारतातील आमच्या पहिल्या स्टोअरमध्ये तुमचे स्वागत करण्यास तयार आहोत. यासोबतच तुम्ही अॅपल बीकेसीमध्ये येऊन तुमची क्रिएटीव्हीटी दाखवू शकता."

मुंबईतील हे अॅपल स्टोअर देशाच्या आर्थिक राजधानीत लोकप्रिय असलेल्या काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या थीमवर तयार करण्यात आले आहे. अॅपल बीकेसीच्या क्रिएटिव्हमध्ये अनेक अॅपल उत्पादनांचे स्पष्टीकरण दाखवण्यात आले आहे.

या सेवा स्टोअरमध्ये उपलब्ध

हे अॅपल स्टोअर भारतातील दिग्गज टेक कंपनीचे पहिले स्टोअर आहे आणि येथे ग्राहकांना अॅपलच्या अनेक सेवा देखील मिळतील. अॅपलच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "नव्या स्टोअरच्या उद्घाटनाचे सेलिब्रेशन करण्यासाठी यूजर्स अॅपल बीकेसीचा वाॅलपेपर डाऊनलोड करु शकतात. यासह अॅपल म्युझिकवर खास तयार केलेली प्लेलिस्टही पाहू शकतात.

या पदासाठी जागा

अॅपलच्या आयफोन आणि मॅक बूकची भारतात खूप दिवसांपासून विक्री होत होती, पण आतापर्यंत भारतात अॅपलचे अधिकृत ऑफलाईन स्टोअर नव्हते. काही दिवसांपूर्वी, अॅपल आपल्या ऑफलाइन स्टोअरसाठी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी १२ पदांवर काम करत होते. अॅपलच्या ऑफलाइन स्टोअर्सच्या रिक्त पदांमध्ये तांत्रिक विशेषज्ञ, व्यवसाय तज्ञ, वरिष्ठ व्यवस्थापक, स्टोअर लीडर आणि इतर पदांचा समावेश आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग