मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Silver Ornaments : लहान मुलांना का घातले जातात चांदीचे दागिने?

Silver Ornaments : लहान मुलांना का घातले जातात चांदीचे दागिने?

Apr 01, 2023, 02:10 PM IST

  • Importance Of Silver : लहान मुलांना चांदीच का घातली जाते असा प्रश्न विचारला तर त्याचं शास्त्रीय कारण सांगता येतं का?, नाही ना. मग आज आपण जाणून घेऊया लहान मुलांना चांदीचे दागिने का घातले जातात? आणि त्यामागचं नेमकं कारण काय?

लहान मुलांना का घालतात चांदीचे दागिने (freepik)

Importance Of Silver : लहान मुलांना चांदीच का घातली जाते असा प्रश्न विचारला तर त्याचं शास्त्रीय कारण सांगता येतं का?, नाही ना. मग आज आपण जाणून घेऊया लहान मुलांना चांदीचे दागिने का घातले जातात? आणि त्यामागचं नेमकं कारण काय?

  • Importance Of Silver : लहान मुलांना चांदीच का घातली जाते असा प्रश्न विचारला तर त्याचं शास्त्रीय कारण सांगता येतं का?, नाही ना. मग आज आपण जाणून घेऊया लहान मुलांना चांदीचे दागिने का घातले जातात? आणि त्यामागचं नेमकं कारण काय?

आपल्या घरात एका लहानग्याचं आगमन झाल्यावर आपण त्यांच्यासाठी अत्यंत आवडीने चांदीचे दागिने घेतो. आपले नातेवाईक किंवा घरातली जेष्ठ मंडळी आपल्या त्या लहानग्यांना एखाद्या शुभ प्रसंगी असेच चांदीचे दागिने भेट देतात. हातातल्या चांदीच्या बांगड्या असोत, कमरेवरचा चांदीचा करगोटा असो, पायात घालायच्या जोड्या असोत. चांदी त्या लहानग्याच्या अंगावर अत्यंत शोभून दिसते. मात्र लहान मुलांना चांदीच का घातली जाते असा प्रश्न विचारला तर त्याचं शास्त्रीय कारण सांगता येतं का?, नाही ना. मग आज आपण जाणून घेऊया लहान मुलांना चांदीचे दागिने का घातले जातात? आणि त्यामागचं नेमकं कारण काय?.

संबंधित फोटो

Horoscope 27 April 2024 : शनिदेव आज या राशींचे भाग्य उजळवणार, शनिवारचा दिवस तुम्हाला कसा जाईल? वाचा राशीभविष्य

Apr 27, 2024 04:00 AM

Guru Shukra Yuti 2024: १२ वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र येणार गुरु आणि शुक्र! 'या' ३ राशींना मिळणार भरपूर यश

Apr 26, 2024 03:58 PM

Shukra Gochar: शुक्र चाल बदलणार; ‘या’ राशींना दुःख भोगावं लागणार! जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी

Apr 26, 2024 12:58 PM

Rashi Bhavishya Today : वरियान योगात शुक्रवार कोणत्या राशीच्या लोकांना लाभदायक राहील! वाचा राशीभविष्य

Apr 26, 2024 04:00 AM

Shukra Surya Yuti : नोकरीत बढती, व्यवसायात भरघोस नफा! शुक्र-सूर्य संयोगात मेष राशीचे भाग्य उजळणार

Apr 25, 2024 10:24 PM

Guru Money Luck: गुरु आणि सूर्याची अनोखी युती ‘या’ राशींना करणार मालामाल! पाहा कोणत्या आहे या राशी...

Apr 25, 2024 05:38 PM

चांदी हा धातू अत्यंत महत्वाचा धातू म्हणून मानला गेला आहे. स्त्रियांच्या अगदी डोक्यापासून ते पायाच्या जोडवीपर्यंत चांदीचे दागिने पाहायला मिळतात. लहान मुलांनाही चांदीचे दागिने बनवले जातात, त्याच चांदीचे दागिने लहान मुलांना घालण्याचं महत्व काय आहे, हे जाणून घेऊया.

लहान मुलांना चांदीचे दागिने घालण्याचे फायदे

मुलांचा मानसिक विकास होतो

चांदीचे दागिने घातल्याने मुलांच्या मानसिक विकासात कोणतीही कमतरता येत नाही, असा समज आहे. चांदी धातू हा मनाचा कारक मानला जातो. म्हणूनच लहान मुलाला चांदीचे दागिने घातल्याने त्यांचा मानसिक विकास चांगला होतो आणि त्याचा त्यांच्या मनावरही सकारात्मक परिणाम होतो. यामुळे लहान मुलांना चांदीच्या बांगड्या आणि पैंजण घातले जातात.

चांदीमुळे मुलांच्या अंगातली उर्जा बाहेर जात नाही

ज्योतिषशास्त्रानुसार लहान मुलांनी पायात पैजण, गळ्यात माळ, हातात चांदीच्या बांगड्या घालण अत्यंत चांगलं असतं. चांदी हा चंद्राचा धातू मानला जातो आणि चादीला मनाचे प्रतीक देखील मानलं गेलं आहे. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून बोलायचं झालं तर, चांदी हा एक प्रतिक्रियाशील धातू आहे आणि चांदी शरीरातून सोडलेली ऊर्जा शरीरात परत करते.

रोगांशी लढण्याची क्षमता

चांदीला जंतूनाशक धातू देखील मानले जाते. चांदीमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता असते. चांदीमुळे लहान मुलांची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. असे मानले जाते की लहान मुलांना चांदी घातल्याने जंतू आणि रोग कमी होतात आणि मुले निरोगी राहतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग