मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli : किंग कोहलीचे ६०० चौकार, आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार कोणी मारले? रोहित शर्माचा नंबर कितवा? पाहा

Virat Kohli : किंग कोहलीचे ६०० चौकार, आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार कोणी मारले? रोहित शर्माचा नंबर कितवा? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 20, 2023 06:36 PM IST

virat kohli completed 600 fours in IPL : आयपीएलमध्ये विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपत आहे. विराट आपल्याच संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली आता IPL मध्ये ६०० हून अधिक चौकार मारणारा फलंदाज बनला आहे.

virat kohli 600 fours in ipl
virat kohli 600 fours in ipl

virat kohli 600 fours in ipl : आयपीएल 2023 चा २७ वा सामना (२० एप्रिल) पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात होत आहे. मोहालीत सुरु असलेल्या या सामन्यात पंजाबने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १७४ धावा केल्या.

आरसीबीकडून या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. कोहलीने ४७ चेंडूत ५९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि एक षटकार लगावला. या खेळीनंतर विराटने आयपीएलमध्ये ६०० चौकार पूर्ण केले आहेत. विराटच्या नावावर आता आयपीएलमध्ये सहाशेहून अधिक चौकार झाले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहेत का?

सर्वाधिक चौकार शिखर धवनच्या नावावर

IPL 2023 मध्ये विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपत आहे. विराट आपल्याच संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनंतर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली आता IPL मध्ये ६०० हून अधिक चौकार मारणारा फलंदाज बनला आहे. या यादीत पहिले नाव शिखर धवनचे आहे. शिखर धवनने आयपीएलच्या २०९ डावांमध्ये एकूण ७३० चौकार मारले आहेत. धवन हा आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज आहे.

या यादीत डेव्हिड वॉर्नरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने आतापर्यंत आयपीएलच्या १६७ डावांमध्ये एकूण ६०८ चौकार मारले आहेत. तर या यादीत विराट कोहलीचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आयपीएलच्या २२१ डावांमध्ये आतापर्यंत ६०३ चौकार मारले आहेत. या यादीत रोहित शर्माचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने आयपीएलच्या २२७ डावांमध्ये एकूण ५३५ चौकार मारले आहेत.

सर्वाधिक चौकार मारणाऱ्यांच्या यादीत सुरेश रैनाचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. रैनाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण २०० डावात फलंदाजी केली, ज्यात त्याने एकूण ५०६ चौकार मारले आहेत.

WhatsApp channel