Virat Kohali: होळी हा सण संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी सर्वजण एकमेकांना रंग लावतात. टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनीही होळी साजरी केली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी क्रिकेटपटूंनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हजेरी लावत आहेत. आता त्यांनी बसमध्ये होळी खेळली आहे. शुभमन गिलने हे सर्व त्याच्या फोनवर रेकॉर्ड केले आणि त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.