मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli : आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहलीने लेकीसोबत घालवला वेळ; फोटो शेयर करत म्हणाला...

Virat Kohli : आरसीबीच्या पराभवानंतर विराट कोहलीने लेकीसोबत घालवला वेळ; फोटो शेयर करत म्हणाला...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 11, 2023 05:08 PM IST

Vamika Kohli Photos : आयपीएलमध्ये लखनौकडून आरसीबीचा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने लेक वामिकासोबत वेळ घालवला आहे.

Virat Kohli With Vamika Kohli
Virat Kohli With Vamika Kohli (HT)

Virat Kohli With Vamika Kohli : मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यानंतर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगुळुरुला आयपीएलमधील सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौविरुद्ध झालेल्या सामन्यात तर आरसीबीला अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता विराट कोहलीने आयपीएलचं मैदान सोडून थेट लेक वामिका कोहलीसोबत वेळ घालवला आहे. एका स्विमिंग पुलमध्ये विराटने मुलगी वामिका सोबत मज्जा केली असून त्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. बापलेकीचा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला पसंती देत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

विराट कोहलीने शेयर केलेल्या फोटोत तो वामिका कोहलीसोबत एका स्विमिंग पुलच्या किनाऱ्यावर बसलेला आहे. त्यावेळी त्याने प्रेमाचं इमोजी शेयर केलं आहे. यापूर्वी देखील विराट आणि वामिकाने अनेकदा धमाल केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु आता आयपीएलमध्ये लागोपाठ दोन पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने लेकीसोबत वेळ घालवला आहे. विराट कोहलीने शेयर केलेल्या फोटोमध्ये अनुष्का शर्मा मात्र कुठेही दिसत नाहीये. त्यामुळं सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

विराट आणि अनुष्का या जोडीने अनेकदा लेक वामिकासोबत विदेशात वेळ घालवत धम्माल केलेली आहे. विरुष्काने वामिका कोहलीचा फोटो अद्याप सोशल मीडियावर टाकलेला नाही. त्यांच्याकडून नेहमीच वामिकाचा चेहरा सीक्रेट ठेवला जातो. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी २०१७ साली इटलीत लग्न केलं होतं. त्यानंतर २०२१ साली त्यांना मुलगी झाली होती.

WhatsApp channel