मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs LSG IPL 2023 : जिंकल्यानंतर मैदानावर राडा करणं लखनौला भोवणार, आयपीएलने आवेश खानला फटकारलं

RCB vs LSG IPL 2023 : जिंकल्यानंतर मैदानावर राडा करणं लखनौला भोवणार, आयपीएलने आवेश खानला फटकारलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 11, 2023 04:12 PM IST

RCB vs LSG IPL 2023 : अखेरच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर लखनौच्या आवेश खानने हेल्मेट मैदानावर आदळला होता. त्यानंतर आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Avesh Khan Throw Helmet
Avesh Khan Throw Helmet (PTI)

Avesh Khan Throw Helmet : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि केएल राहुलच्या लखनौ सुपर जायंट्समध्ये अत्यंत थरारक आणि चुरशीचा सामना झाला आहे. यात लखनौने अखेरच्या चेंडूवर एका गड्याने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर आरसीबीला यंदाच्या आयपीएलमध्ये सलग दुसऱ्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. याशिवाय लखनौची गाडी सुस्साट सुटत आयपीएलच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. परंतु आता आरसीबीवर विजय मिळवल्यानंतर लखनौचा गोलंदाज आवेश खानला मैदानावर हेल्मेट आदळणं चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण आता या प्रकरणाची आयपीएलच्या प्रशासकीय समितीकडून दखल घेण्यात आली असून त्यात आवेश खानला दोषी ठरवण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. सामना एक विकेट्सने जिंकल्यानंतर लखनौच्या आवेश खानने आनंदाच्या भरात हेल्मेट काढून जमिनीवर आदळला. याशिवाय संघातील अन्य खेळाडूंनी मैदानावर जोरदार राडा घातला. त्यामुळं आता लखनौच्या खेळाडूने केलेलं कृत्य हे आयपीएलच्या आचारसंहितेतील नियमांचे उल्लंघन असल्याचं सांगत आयपीएलच्या प्रशासकीय समितीनं लखनौ संघाला आणि आवेश खानला खडेबोल सुनावले आहे. याशिवाय हेल्मेट जमिनीवर आदळल्याप्रकरणी आवेश खान लेव्हल एक च्या गुन्ह्यात दोषी आढळला आहे. त्यामुळं आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयपीएलच्या प्रशासकीय समितीनं दोषी ठरवल्यानंतर लखनौचा गोलंदाज आवेश खानने आपली चूक मान्य केली आहे. परंतु लेव्हल एक च्या नियमात दोषी ठरलेल्या खेळाडूच्या मॅच फीसमध्ये ५० टक्क्यांची रक्कम कापण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळं कालच्या सामन्यानंतर आवेश खानवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु त्याने असं कृत्य पुन्हा केल्यास तो लेव्हल दोनच्या नियमानुसार दोषी ठरू शकतो. त्यानंतर आयपीएलकडून त्याच्या मॅच फीसमध्ये ५० ते १०० टक्क्यांची कपात होऊ शकते. याशिवाय आवेश खानवर काही सामन्यांची देखील बंदी येऊ शकते.

WhatsApp channel