मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB vs LSG : लखनौच्या विजयानंतर गौतम गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांना डिवचलं, पाहा व्हायरल व्हिडिओ

RCB vs LSG : लखनौच्या विजयानंतर गौतम गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांना डिवचलं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 11, 2023 04:39 PM IST

RCB vs LSG IPL 2023 : थरारक सामन्यात लखनौने अखेरच्या चेंडूवर बाजी मारली. त्यानंतर गौतम गंभीरने जोरदार सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Virat Kohli and Gatam Gambhir
Virat Kohli and Gatam Gambhir (PTI)

Gautam Gambhir Reaction In RCB vs LSG Match : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सला नमवल्यानंतर विराट कोहलीच्या आरसीबीला यंदाच्या आयपीएलमध्ये सलग दुसऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी आणि लखनौच्या सामन्यात सर्वांच्या नजरा या विराट कोहली आणि लखनौचा मेंटोर गौतम गंभीर या दोघांवर होती. पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धींच्या संघात सामना होत असल्यामुळं दोन्ही संघातील खेळाडूंनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु अखेरच्या चेंडूवर लखनौच्या आवेश खानने एकेरी धाव घेत आरसीबीचा पराभव केला. परंतु आरसीबीवर विजय मिळवल्यानंतर लखनौचा मेंटोर गौतम गंभीरने जोरदार सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं.

ट्रेंडिंग न्यूज

आवेश खानने एकेरी धाव घेताच लखनौचा मेंटोर गौतम गंभीरने मैदानाकडे धाव घेत जोरदार सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. याशिवाय विराट कोहली याच्याकडे पाहून गंभीरने प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 'तोंडावर बोट ठेवून आमचा विजय झालाय, आता आरसीबीचा जयजयकार करणं थांबवा', जणू असंच काही गौतम गंभीर सांगण्याचा प्रयत्न करत होता. आता गौतम गंभीरच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर अनेकांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकांनी त्याच्या सेलिब्रेशनला पाठिंबा दिला तर काहींनी त्याचं हे वागणं बरं नसल्याचं म्हटलं आहे.

लखनौने यंदाच्या आयपीएलमध्ये तीन सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. तर आरसीबीने सलग दोन सामने गमावल्यामुळं त्यांचं स्थान घसरलं आहे. पुढच्या काही दिवसांत आरसीबी आणि लखनौमध्ये पुन्हा सामना होणार आहे. त्यामुळं आता विराट कोहली गौतम गंभीरच्या सेलिब्रेशनची व्याजासहित परतफेड करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

WhatsApp channel