मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Delhi Capitals Captain : डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार, तर हा भारतीय खेळाडू उपकर्णधार

Delhi Capitals Captain : डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार, तर हा भारतीय खेळाडू उपकर्णधार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 23, 2023 02:16 PM IST

Delhi Capitals Captain: आयपीएल २०२३ साठी दिल्ली कॅपिटल्सने मोठा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने IPL 2023 साठी डेव्हिड वॉर्नरची (axar patel vice captain delhi capitals) कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

david warner delhi Capitals captain
david warner delhi Capitals captain

david warner delhi Capitals captain for IPL 2023 : आयपीएल २०२३ पूर्वी दिल्ली कॅपिटल्सला कर्णधारपदाची समस्या भेडसावत होती. ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी फ्रँचायझीला ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत एका खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवावी लागली. दिल्लीच्या वतीने ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरकडे संघाची कमान सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. 

दिल्ली फ्रँचायझीच्या मॅनेजमेंटने याला दुजोरा दिला आहे. Cricbuzz शी बोलताना दिल्ली कॅपिटल्सच्या मालकी गटाच्या सदस्याने सांगितले की, "डेव्हिड वॉर्नर आमचा कर्णधार असेल आणि अक्षर पटेल त्याचा उपकर्णधार असेल."

यापूर्वी संघाची कमान ऋषभ पंतच्या हाती होती. अपघातामुळे पंत आयपीएलच्या १६व्या हंगामाला मुकणार आहे. यामुळे फ्रँचायझीकडून नवीन कर्णधारपदाची घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीची दिल्लीची कामगिरी

आयपीएल २०२२ मध्ये, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ पाचव्या क्रमांकावर राहिला. संघाने एकूण १४ पैकी ७ सामने जिंकले आणि ७ सामने गमावले. अशा स्थितीत यावेळी दिल्लीची कामगिरी कशी असेल, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. वॉर्नर बराच काळ आयपीएलमध्ये खेळत आहे. अशा स्थितीत त्याच्या नेतृत्वाखाली संघाला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. वॉर्नर हा अनुभवी खेळाडू आहे.

वॉर्नरची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द

डेव्हिड वॉर्नरने मे २००९ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले, तेव्हापासून तो एकूण १६२ आयपीएल सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना ४२.०१ च्या सरासरीने ५८८१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण ४ शतके आणि ५५ अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या १२६ आहे.

WhatsApp channel