RCB Players in Green Jersey : यंदाच्या आयपीएलची सुरुवात फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी चांगली राहिलेली आहे.
(Royal Challengers Bangalore)RCB Green Jersey : मुंबई इंडियन्सला हरवत आरसीबीने आयपीएलची सुरुवात केली आहे. परंतु आता २३ मार्चला होणाऱ्या सामन्यात आरसीबीचे खेळाडू ग्रीन जर्सी घालून खेळणार आहेत.
(Royal Challengers Bangalore)Royal Challengers Bangalore : आरसीबीत हिरवी जर्सी घालण्याचा ट्रेंड २०११ सालापासून सुरू झालेला आहे. त्यानंतरपासून दरवर्षी आरसीबीचे खेळाडू एका सामन्यासाठी ग्रीन जर्सी घालतात.
(Royal Challengers Bangalore)लोकांना पर्यावरण आणि ग्लोबल वॉर्मिंगबाबत जागरुक करण्यासाठी आरसीबी हिरवी रंगाची जर्सी घालून सकारात्मक संदेश देण्याचं काम करत असते.
(Royal Challengers Bangalore)झाडे लावणं, त्यांची काळजी घेणं आणि जंगलतोड टाळणं, हा संदेश देखील आरसीबीकडून दरवर्षी आयपीएलमध्ये देण्यात येत असतो.
(Royal Challengers Bangalore)