मराठी बातम्या  /  क्रीडा  /  RCB VS PBKS Highlights : रोमहर्षक सामन्यात पंजाबचा पराभव, सिराजनं ४ विकेट घेत फिरवला सामना

RCB VS PBKS Highlights : रोमहर्षक सामन्यात पंजाबचा पराभव, सिराजनं ४ विकेट घेत फिरवला सामना

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 20, 2023 03:05 PM IST

PBKS vs RCB Live Score : आयपीएल 2023 चा २७ वा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात झाला. या सामन्यात पंजाबचा २४ धावांनी पराभव झाला.

PBKS Vs RCB IPL Live Score
PBKS Vs RCB IPL Live Score

IPL Cricket Score, PBKS vs RCB Indian Premier League 2023 : आयपीएल 2023 मध्ये आज (२० एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जला हरवून आयपीएल 2023 मध्ये तिसरा विजय नोंदवला आहे. मोहालीमध्ये पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ केवळ १५० धावा करू शकला आणि सामना २४ धावांनी गमावला.

PBKS vs RCB Score updates : 

रोमहर्षक सामन्यात आरसाबीचा विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा २४ धावांनी पराभव केला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. कोहली आणि प्लेसिसने १३७ धावांची भागीदारी केली. दोघांच्या अर्धशतकांमुळे आरसीबीने चार गडी गमावून १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ १८.२ षटकांत केवळ १५० धावाच करू शकला आणि सामना २४ धावांनी गमावला. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. त्याचवेळी जितेश शर्माने ४१ धावांची खेळी केली.

पंजाबकडून हरप्रीत ब्रारने दोन आणि अर्शदीप, नॅथन एलिसने प्रत्येकी एक बळी घेतला. तर आरसीबीसाठी सिराजने चार विकेट घेत सामना फिरवला. हसरंगाला दोन, वेन पारनेल आणि हर्षल पटेलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

या सामन्यातील विजयासह आरसीबीचा संघ सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचबरोबर पंजाबचा संघ सातव्या स्थानावर घसरला आहे. दोन्ही संघांचे सहा सामन्यांत सहा गुण आहेत.

RCB VS PBKS LIVE SCORE : पंजाबची सातवी विकेट पडली

१०६ धावांवर पंजाब किंग्जची सातवी विकेट पडली. शाहरुख खान पाच चेंडूत सात धावा करून बाद झाला आहे. वनिंदू हसरंगाने त्याला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककरवी यष्टिचित केले. आता जितेश शर्मासोबत हरप्रीत ब्रार क्रीझवर आहे.

RCB VS PBKS LIVE SCORE : पंजाबच्या ९ षटकात ७४ धावा

पंजाब किंग्जने ९ षटकात ४ बाद ७४ धावा केल्या आहेत. सध्या प्रभसिमरन सिंग आणि सॅम करन क्रीजवर आहेत. पंजाबला ११ षटकात १०५ धावांची आवश्यकता आहे. लियाम लिव्हिंस्टोन, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया आणि अथर्व तायडे हे फलंदाज बाद झाले आहेत.

RCB VS PBKS LIVE SCORE : पंजाबची पहिली विकेट पडली

पंजाब किंग्जची पहिली विकेट चार धावांच्या स्कोअरवर पडली. अथर्व तायडे चार धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला पायचीत केले. आता मॅथ्यू शॉर्ट प्रभसिमरन सिंगसोबत क्रीजवर आहे. एका षटकानंतर पंजाबची धावसंख्या एका विकेटवर ९ धावा आहे.

RCB VS PBKS LIVE SCORE : पंजाबसमोर १७५ धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून १७४ धावा केल्या. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांनी आरसीबीसाठी १३७ धावांची शानदार भागीदारी केली. या दोघांनी एकूण ९७ चेंडूंचा सामना केला. मात्र, ही जोडी बाद झाल्यानंतर शेवटी कोणालाही झटपट धावा करता आल्या नाहीत आणि आरसीबीचा संघ २०० धावांचा टप्पा पार करू शकला नाही. शेवटी सॅम करन आणि अर्शदीप सिंग यांनी चांगली गोलंदाजी करत आरसीबीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.

RCB VS PBKS LIVE SCORE : डुप्लेसिस तंबूत

१५१ धावांवर आरसीबीचा तिसरा फलंदाज बाद झाला. फाफ डुप्लेसिस ५६ चेंडूत ८४ धावा करून बाद झाला. त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले. डुप्लेसिसला नॅथन एलिसने सॅम करनकरवी झेलबाद केले. आरसीबीच्या १८ षटकात ३ बाद १५४ धावा झाल्या आहेत. कार्तिक आणि महिपाल लोमरोर क्रीजवर आहेत.

RCB VS PBKS LIVE SCORE : आरसीबीची पहिली विकेट पडली

आरसीबीची पहिली विकेट १३७ धावांवर पडली. हरप्रीत ब्रारने विराटला यष्टिरक्षक जितेश शर्माकरवी झेलबाद केले. कोहलीने ४७ चेंडूत ५९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला.

RCB VS PBKS LIVE SCORE : विराट-डुप्लेसिसची अर्धशतकं

विराट-डुप्लेसिसची अर्धशतकं झाली आहेत. विराट ४६ चेंडूत ५९ तर डुप्लेसिस ५१ चेंडूत ७० धावांवर खेळत आहेत. आरसीबीच्या १६ षटकांत बिनबाद १३७ धावा झाल्या आहेत.

RCB VS PBKS LIVE SCORE : आरसीबीची धावसंख्या ५०च्या पुढे

आरसीबीने बिनबाद ५० धावांचा टप्पा पार केला आहेत. कोहली आणि प्लेसिस दोघेही चांगल्या टचमध्ये दिसत आहेत. पॉवरप्लेमध्ये आरसीबी संघाने एकही विकेट न गमावता ५९ धावा केल्या आहेत.

RCB VS PBKS LIVE SCORE : आरसीबीची चांगली सुरुवात

विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस या जोडीने पुन्हा एकदा आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली आहे. दोघेही वेगाने धावा करत आहेत आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात आहेत. आरसीबीने ४ षटकात बिनबाद ४० धावा केल्या आहेत.

RCB VS PBKS LIVE SCORE : दोन्ही संघ 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग

RCB VS PBKS LIVE SCORE : डुप्लेसिस इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत कोहली संघाचे नेतृत्व करत आहे.

RCB VS PBKS LIVE SCORE : कोहली आरसीबीचा कर्णधार 

पंजाबविरुद्ध खेळल्या जाणार्‍या या सामन्यात बंगळुरूचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर पंजाब किंग्जचे नेतृत्व सॅम करन करणार आहे.

RCB VS PBKS LIVE SCORE : पंजाबने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन या सामन्यासाठी फिट नाही. त्याच्या जागी सॅम करन कर्णधार आहे. पंजाबकडून या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोन खेळत आहे.

WhatsApp channel