मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एकतर्फी प्रेमातून मामेभाऊ सतत छळायचा; त्रासलेल्या तरुणीनं घरी बोलवून जिवंत जाळलं!

एकतर्फी प्रेमातून मामेभाऊ सतत छळायचा; त्रासलेल्या तरुणीनं घरी बोलवून जिवंत जाळलं!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 06, 2024 12:29 PM IST

One sided love crime in Delhi: राजधानी दिल्लीतील वजिराबाद परिसरात एका तरुणीने एकतर्फी प्रेमातून तिला त्रास देणाऱ्या तिच्या प्रियकराला पेट्रोल टाकून जीवंत जाळले.

one side love crime in Delhi
one side love crime in Delhi

one side love crime in Delhi: राजधानी दिल्लीतील वजिराबाद परिसरात एका तरुणीने एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या लांबच्या नात्यातील भावाची पेट्रोल ओतून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.

Sunil Kamble : पोलिसावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळेंना भोवलं! गुन्हा दाखल

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अब्दुल्ला असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. अब्दुल्ला हा त्याच्या कुटुंबासोबत संगम विहार भागात राहायला होता. तो एका ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. अब्दुल्ला यांच्या मामाचे कुटुंबही या परिसरात होते. अब्दुल्लाचे त्याच्या मामे बहीणीवर एकतर्फी प्रेम होते. याटुन्न तो तिला त्रास देत असे. हा त्रास सहन न झाल्याने पीडितेने अब्दुल्ला याला निरोप देऊन त्याला घरी बोलावले. घरात कोणी नव्हते. अब्दुल्ला मामाच्या घरी पोहोचल्यावर बहिणीने त्याला सोफ्यावर बसवले. तसेच चहा आणण्याच्या बहाण्याने आत गेली. काही वेळाने तिने बाटलीत पेट्रोल आणून अब्दुल्लावर ओतले. यानंतर कडीपेटीच्या साह्याने त्याला पेटवून दिले.

Maharashtra weather update : राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता; बाहेर पडतांना काळजी घ्या; असे असेल हवामान

आग लागल्यानंतर अब्दुल्ला पळत पलत बाहेर आला. त्याने अंगावरील कपडे फेकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तो बराच भाजला होता. स्थानिक लोकांनी पाण्याच्या साह्याने आग विझवली. तसेच त्याला दवाखान्यात भरती करत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असतानाच शुक्रवारी पहाटे तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, तपासतून एकतर्फी प्रेमातून कंटाळून तरुणीने अब्दुल्ला याला पेटवल्याचा प्रकार पुढे आला. दरम्यान, खरी माहिती लपवण्यासाठी तसेच त्याला अडवण्यासाठी खोटे बोलत आहे का ? याचा देखील पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून अब्दुल्लाचा फोनही तपासला जाणार आहे.

अब्दुल्लाचा मृत्यू होण्यापूर्वी पोलिसांनी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत जबाब नोंदवला होता. त्याच्या मामे बहिणीने पेट्रोल फवारून त्याला जाळण्याचा आरोप त्याने केला होता. मात्र, याचे कारण त्याने सांगितले नव्हते. तपासाशी संबंधित एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात अब्दुल्लाचे तरुणीवर एकतर्फी प्रेम असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मामे बहिणीचा साखरपुडा देखील झाला होता. याच सोहळ्यादरम्यान अब्दुल्लाने तिच्या हाताची नस कापली होती.

WhatsApp channel

विभाग