Flight Fight Viral Video: बस, रेल्वेनंतर आता विमानातील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.विमानाने उड्डाण केल्यापासून संबंधित प्रवाशाने गोंधल घालायला सुरुवात केली. सुरुवातीला हे प्रकरण अगदी सामान्य वाटत होते. मात्र, विमान विमानतळावर पोहोचले असता प्रवाशाने फ्लाइट अटेंडंट आणि पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण केल्यापासून आरोपी प्रवाशाने गोधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र, विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याचा इतर प्रवाशांशी वाद झाला. त्या माणसाचे वागणे पाहून एका प्रवाशाने त्याच्या आवडत्या संघावर कमेंट केली. त्यानंतर तो चिडला आणि वाद पेटला. विमान एडिनबर्गहून अंतल्याला जात होते. विमान अंटाल्यात उतरताच पोलीस कर्मचारी विमानात चढले आणि त्याला घेऊन जाण्यास सुरुवात केली. पण त्याने फ्लाइट अटेंडंट आणि पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली.
त्या व्यक्तीचे वागणे पाहून फ्लाइटमध्ये उपस्थित असलेली एक मुलगी घाबरली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी घाबरली आहे आणि तिची आई तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. काही वेळानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या घालून विमानातून बाहेर काढले. तो व्यक्ती दारूच्या नशेत होता. त्याच्याजवळ व्होडकाची रिकामी बाटलीही सापडल्याचे सांगण्यात आले. इतर प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, तो संपूर्ण प्रवासात सर्वांना त्रास देत होता.
काही दिवसांपूर्वी महिलेची छेड काढणाऱ्या बस चालकला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार बीडच्या गेवराई बसस्थानकात घडला. या मारहाणीचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाने सामान कॅबिनमध्ये ठेवण्याच्या बहाण्याने एका महिलेची छेड काढली. संतापलेल्या महिलेनं शिवीगाळ करायला सुरुवात केली. यानंतर महिलेच्या दिराने चालकाला बेदम मारहाण केली. योगेश अर्जुन लव्हाळे असे बस चालकाचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.