मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गळ्यात पुष्पहार घालताना नवरी दाखवू लागली नखरे, मग नवरदेवाच्या कृतीचे भांबावले वऱ्हाडी, पाहा VIDEO

गळ्यात पुष्पहार घालताना नवरी दाखवू लागली नखरे, मग नवरदेवाच्या कृतीचे भांबावले वऱ्हाडी, पाहा VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 23, 2024 07:40 PM IST

Viral Video : मुलीचे नातेवाईक नवरीला उचलून खांद्यावर घेतात. मात्र नवरीच्या गळ्यात पुष्पमाला घालण्यासाठी भन्नाट शक्कल लढवतो. नवरा खुर्चीवर चढून तेथून नवरीच्या अंगावर झेप घेतो.

लग्नातील व्हिडिओ व्हायरल
लग्नातील व्हिडिओ व्हायरल

भारतात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे.लग्नातील संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले जातात व ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेक व्हिडिओ नेटीझन्सना पसंत पडत असतात. यामुळे लग्नाचे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात. कधी कधी या व्हिडिओमधून असे काही प्रकार समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणे मुश्किल होतो. तर काही व्हिडिओ पाहून लोकांची हसून हसून पुरेवाट होते.

ट्रेंडिंग न्यूज

सद्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते की, जयमाला कार्यक्रमासाठी नवरा-नवरी स्टेजवर आहेत. लग्नाचे विधी सुरू आहेत.

हा व्हिडिओ नवरदेवाच्या कृतीमुळे लोकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, वर-वधू स्टेजवर उभे आहेत. पुष्पमाला घालण्याचे विधी केले जात आहेत. वधूने वराच्या गळ्यात पुष्पमाला घातली आहे. नवरदेवाने आरामात हार आपल्या गळ्यात घालून घेतला. मात्र जेव्हा नवरीची बारी आली तेव्हाती नखरे दाखवू लागली. नवरदेव पुष्ममाला गळ्यात घालायला पुढे जाताच नवरी मागे सकरते. त्याचवेळी मुलीचे नातेवाईक नवरीला उचलून खांद्यावर घेतात. मात्र नवरीच्या गळ्यात पुष्पमाला घालण्यासाठी भन्नाट शक्कल लढवतो. नवरा खुर्चीवर चढून तेथून नवरीच्या अंगावर झेप घेतो. यामुळे नवरी व तिला उचलून घेतलेले नातेवाईक स्टेजवरच कोसळतात. मात्र यात नवरदेवाने पुष्पमाला नवरीच्या गळ्यात घातलेली दिसते.

हा व्हिडिओ@sarita_sarawag या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.२२ एप्रिल रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ४८९.२ हजार लोकांनी पाहिला आहे. तसेच ३.२ हजार लोकांनी लाईक केले आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

नववधू-वरांसमोरच भाजप सरकारमधील मंत्र्यांला मारहाण –

योगी सरकारमधील मंत्री संजय निषाद यांच्यावर हल्ला झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ एक लग्न समारंभातील असून लोकांची गर्दी दिसत आहे.काही लोकांनी यूपी सरकारचे मंत्री संजय निषाद यांच्यावर हल्ला केला आहे. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी मंत्र्यांना लोकांच्या तावडीतून कसेबसे सोडवले. मंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा कोणीतरी व्हिडिओ बनवला व सोशल मीडियावर व्हायरल केला. या हल्ल्यात मंत्री संजय निषाद जखमी झाले आहेत. त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.

IPL_Entry_Point

विभाग