Vrial News : एका घरात चोरट्यांनी चोरी केली. रोख रक्कमही लुटली. मात्र, जातांना त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने त्यांनी भिंतीवर घरमालकाच्या नावाने चिट्ठी लिहून माफी मागितली. ही चिट्ठी घरमालकाने सोशल मीडियावर पोस्ट केली असून आता चोरट्यांनी लिहिलेले हे पत्र सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. अनेकांनी यावर पोस्ट लिहून प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
११ एप्रिल रोजी प्रकाश चंद्र हे त्यांच्या वडिलोपार्जित घर असलेल्या पिथौरागढ येथे गेले. १३ एप्रिल रोजी सकाळी त्यांना एका परिचित व्यक्तीचा फोन आला. त्याने त्यांच्या घराजवली गल्ली क्रमांक चारमध्ये त्यांचे दोन मोबाईल पडलेले असल्याची माहिती दिली. दरम्यान त्यांनी शेजाऱ्यांना घर बघायला पाठवले, तर त्यांना घरी चोरी झाल्याचे दिसले.
चोरट्यांनी आधी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि नंतर असा प्रकार केला की घरमालकही हैराण झाला आहे. हा सगळा प्रकार पोलिसांना कळल्यावर पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. चोरट्यांना त्यांच्या चोरी कारणयाची इतकी लाज वाटली की त्यांनी हे घरच्या भिंतीवर घरमालकाच्या नावाने थेट माफीनामा लिहिला.
सध्या पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हल्दवानी येथील मुखानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका माजी बँक अधिकाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी घराच्या भिंतीवर चिठ्ठी लिहून चोरी करत असल्याची खंतही व्यक्त केली आहे. घरमालक हे त्यांच्या घरी परतल्यानंतर त्यांनी या चोरी प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुखानी पोलीस स्टेशन हद्दीतील लोहारीसाल मल्ला गल्ली क्रमांक एक येथे असलेल्या स्पर्श कॉलनीत राहणारे प्रकाश चंद्र बहुगुणा हे नैनिताल बँकेच्या विशेष सहाय्यक व्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा एक मुलगा दिल्लीत तर दुसरा मुलगा हैदराबादला राहतो. दोन्ही मुले सुट्टीवर घरी आली होती.
११ एप्रिल रोजी प्रकाश चंद्र त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी पिथौरागढ येथे गेले. १३ एप्रिल रोजी सकाळी त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला ज्याने गल्ली क्रमांक चारमध्ये त्यांचे दोन मोबाईल पडलेले असल्याची माहिती त्यांना दिली. चंद्र यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना घर पाहण्यासाठी पाठवले.
शेजारी त्यांच्या घरी गेले असतांना त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याला कुलूप होते, मात्र आतील कुलूप तुटलेले होते. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस शेजाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरात सामान विखुरलेले होते. कपाट उघडे होते. सायंकाळी सातपर्यंत चंद्र हे त्यांच्या घरी परतले.
त्यांच्या घरातून ६० हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. चोरट्यांनी कपाट, ड्रेसिंग टेबल आणि भिंतीवर 'मी तुमच्या घरात चोरी केली. मला तुमच्या घरात सोने सापडले नाही, चोरीबद्दल माफ करा' अशी चिट्ठी भिंतीवर लिहून त्यांनी रोख रक्कम लंपास केली. चोरट्यांनी घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआरही चोरून नेले.
घरमालकाने सांगितले की, ते बँकेच्या लॉकरमध्ये दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवतात. कॉलनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक पंकज जोशी यांनी सांगितले.