Chhatrapati Udayanraje Bhosale satara bjp loksabha candidate: सातारा येथून भाजप कुणाला उमेदवारी देणार याची प्रतीक्षा संपली आहे. या जागेचा भाजपचा तिढा सुटला आहे. भाजपने जारी केलेल्या नव्या यादीत सताऱ्यातून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता सताऱ्यातून उदयनराजे लोकसभा निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले आहे. भोसले यांची उमेदवारी जाहिर होताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून नवी यादी जारी करण्यात आली असून यात उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सातारा येथून भाजप कुणाला उमेदवारी देणार या बाबट उत्सुकता लागून होती. उदयनराजे यांना यंदा तिकीट मिळणार नाही अशा चर्चा होत्या. मात्र, आपल्यालाच उमेदवारी मिळावी या साठी छत्रपती उदयनराजे भोसले हे आग्रही होते. मात्र, त्यांची उमेदवारी जाहीर होत नसल्याने ते नाराज होते. या साठी ते दिल्लीला देखील जाऊन आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळणार अशी घोषणा केली होती. त्यानुसार आज त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर झाले नव्हते. असे असेले तरी सुध्दा त्यांनी प्रचार संभाचा धडाका सुरू केला होता. त्यांनाच उमेदवारी मिळणार या बाबत त्यांचा विश्वास ठाम होता. अखेर त्यांचा हा विश्वास खरा ठरला आहे. भाजपने उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा केल्याने आता येथील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी साताऱ्यात थेट लढत होणार आहे. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी जाहिर होण्यापूर्वी साताऱ्यात जोरदार शक्ति प्रदर्शन केले होते. मात्र, असे असले तरी त्यांच्या नावाची घोषणा भाजप कडून होत नव्हती. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. भाजपची लोकसभा उमेदवारांची आज नवी यादी आली असून यात राज्यातुन उदयनराजेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यात महायुतीत सातारा जागेवरून वाद सुरू होता. या जागेवर अजित पावर यांच्या गटाने दावा केला होता. त्यामुळे ही जागा अजित पवारांच्या वाट्याला जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, असे असले तरी येथून उमेदवारी मिळावी यासाठी उदयनराजे आग्रही होते. या साठी त्यांनी दिल्लीला देखील वारी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.