मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Twitter (X) वर पोस्ट लिहिण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे! एलॉन मस्क म्हणाले, आता पर्याय नाही....

Twitter (X) वर पोस्ट लिहिण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे! एलॉन मस्क म्हणाले, आता पर्याय नाही....

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 16, 2024 12:18 PM IST

twitter users have to pay amount : ट्विटर (X) वापरणाऱ्या यूझर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर यापुढे ट्विटर वापरायचे असल्यास आता त्यांना पैसे भरावे लागणार आहे. या बाबट स्वत: एलॉन मस्क माहिती दिली आहे.

ट्विटर वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे! एलोन मस्क म्हणाले, आता पर्याय नाही....
ट्विटर वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे! एलोन मस्क म्हणाले, आता पर्याय नाही....

twitter users have to pay amount : लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या ट्विटरच्या यूझर्ससाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ट्विटरवर खाते तयार केल्यानंतर, जर यूझर्सलं आता पोस्ट लिहायची असेल तर त्याला पैसे भरावे लागणार आहे. या बाबत स्वत: एलोन मस्क यांनी माहिती दिली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

अमेरिकन अब्जाधीश व ट्विटरचे मालक मस्क म्हणाले, की यूझर्सकडून शुल्क आकारणे हा बॉट्सशी संबंधित समस्या सोडवण्याचा सर्वात थेट आणि सर्वात सोपा मार्ग आहे. याआधीही यूझर्सकडून पैसे आकरण्याबाबट मस्क यांनी त्यांची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वापरकर्त्यांकडून शुल्क आकारल्याशिवाय बॉट खाते कमी होणार नाही असे मस्क म्हणाले होते.

Mumbai heat wave: मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; दुपारी घराबाहेर पडणे टाळा

एलोन मस्क स्वतः ट्विटर वर सक्रिय असतातय. ट्विटर (X) पोस्टला उत्तर देताना, त्यांनी सांगितले की नव्या खात्यांमधून शुल्क आकारणे हा बॉट्स (खोटी खाती) थांबवण्याचा एकमेव मार्ग आहे. मस्कने आपली भूमिका मांडतांना संगितले की, ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या सर्व नवीन वापरकर्त्यांना कोणतीही पोस्ट करण्यासाठी आता आधी शुल्क भरावे लागेल. मात्र, हे शुल्क किरकोळ असून ते आकरण्यामागे फक्त बॉट्स बंद करणे हा राहणार आहे.

KKR vs RR: कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज लढत, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

पैसे भरायचे नाही तर हा आहे पर्याय

कॅप्चा सारख्या टूल्सचे उदाहरण देऊन, एलोन मस्कने लिहिले की विद्यमान AI आणि ट्रोल फार्म्स सहजपणे 'आर यू बॉट' या स्क्रीनला पास करू शकतात. याचा अर्थ असा की सध्याच्या सिस्टीमसह बॉट खाती पकडली किंवा थांबवली जाऊ शकत नाहीत. दुसऱ्या वापरकर्त्याच्या ट्विटला उत्तर देताना, मस्कने लिहिले की जर नवीन खात्यांना पैसे द्यायचे नसतील तर ते खाते तयार केल्यानंतर तीन महिन्यांनंतर कोणतेही शुल्क न देता पोस्ट करू शकणार आहेत.

Mumbai Airport close : मुंबई विमानतळ ‘या’ कारणांमुळे ९ मे रोजी सहा तासांसाठी राहणार बंद राहणार

मस्क यांनी लिहिले आहे की, दुर्दैवाने, बॉट्सशी व्यवहार करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नवीन वापरकर्त्यांना काहीही पोस्ट करण्यापूर्वी थोडे शुल्क देणे गरजेचे राहणार आहे. मस्कने सांगितले की ही प्रणाली फक्त नवीन वापरकर्त्यांसाठी राहणार आहे. त्यांना ३ महिन्यांनंतर हा पोस्ट करण्याचा पर्याय विनामूल्य मिळू शकेल. हे स्पष्ट आहे की नवीन वापरकर्त्यांनी खाते तयार करताच पोस्ट करू इच्छित असल्यास, त्यांना पैसे भरून हे सिद्ध करावे लागेल की ते बॉट नाहीत.

दोन देशांमध्ये चाचणी सुरू

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होत असलेल्या बदलांची माहिती देणाऱ्या एका अकाउंटने सांगितले की, कंपनीने हा प्रयोग दोन देशांमध्ये सुरू केला आहे. न्यूझीलंड आणि फिलीपिन्समध्ये, यूझर्सला वार्षिक १ डॉलर (सुमारे ८५ रुपये) भरण्यास सांगितले जात आहे. नवीन खातेदार इतरांना फॉलो करू शकतात आणि पोस्टवर प्रतिक्रिया देऊ शकतील. मात्र, शुल्क भरल्याशीवाय त्यांना पोस्ट करणे किंवा प्रतिक्रिया देऊ शकणार नाहीत. येथे हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो इतर देशात देखील लागू केला जाणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग