Mumbai Airport close : मुंबई विमानतळ ‘या’ कारणांमुळे ९ मे रोजी सहा तासांसाठी राहणार बंद राहणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Airport close : मुंबई विमानतळ ‘या’ कारणांमुळे ९ मे रोजी सहा तासांसाठी राहणार बंद राहणार

Mumbai Airport close : मुंबई विमानतळ ‘या’ कारणांमुळे ९ मे रोजी सहा तासांसाठी राहणार बंद राहणार

Apr 16, 2024 10:45 AM IST

Mumbai Airport news : मुंबई विमानतळ येत्या ९ मे रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रवाशांनी याची दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई विमानतळ मान्सूनपूर्व तयारीच्या कामासाठी ९ मे रोजी सहा तास बंद राहणार
मुंबई विमानतळ मान्सूनपूर्व तयारीच्या कामासाठी ९ मे रोजी सहा तास बंद राहणार

Mumbai Airport news : मुंबई विमानतळ देशातील महत्वाचे विमानतळ आहे. येथून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होत असतं. मात्र, हे विमानतळ ९ मे रोजी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने अनेक कामे करण्यात येणार असल्याने ही विमानतळ बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशा वेळेत विमानतळ बंद राहणार आहे.

Bombay high court : झोप हा माणसाचा मूलभूत अधिकार; रात्रभर चौकशी करता येणार नाही! हायकोर्टाने ईडीला फटकारले

मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. याचा परिमाण विमानगटाळच्या धावपट्टीवर देखील होतो. त्यामुळे या कालावधीमध्ये मुंबई विमानतळावरील विमान प्रवास व सर्व सुविधा सुरळीत आणि व्यवस्थित राहावे या साठी हे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ही कामे केली जात असतात. हे काम करण्याआधी या बाबतची माहिती ही सर्व विमान कंपन्यांना सहा महिन्या आधीच देण्यात येत असते.

RTE Admission : राज्य शासनाला अखेर मुहूर्त मिळाला! आज पासून आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू

या वर्षी देखील हे काम केले जाणार आहे. ९ मे रोजी ही कामे हाती घेण्यात येणार असल्याने ११ ते ५ या कालावधीमध्ये विमानसेवा तात्पुरती बंद राहणार आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी त्या अनुषंगाने आपल्या विमान उड्डाणांचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर सायंकाळी पाच नंतर विमानतळावरील सेवा पुन्हा सुरळीत होणार आहे. मुंबई विमानतळ हे १ हजार ३३ एकरावर बांधण्यात आले आहे.

विमानतळ ऑपरेटर एमआयएएल (मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) ने विमानतळ बंद राहण्यासंदर्भात सोमवारी निवेदन काढले आहे. यात या बाबत माहिती देण्यात आली आहे.

मुंबई विमानतळ जगातील व्यस्त विमानतळ

मुंबई विमानगळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. येथून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होत असते. हे विमानतळ भव्य आणि प्रशस्त आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक येत असतात. 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर