Mumbai heat wave: मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; दुपारी घराबाहेर पडणे टाळा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai heat wave: मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; दुपारी घराबाहेर पडणे टाळा

Mumbai heat wave: मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; दुपारी घराबाहेर पडणे टाळा

Apr 16, 2024 11:09 AM IST

Mumbai heat wave: राज्याच्या तापमानात मोठे बदल होत आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस ससुरू असून मुंबई (Mumbai Weather), पुणे, ठाण्यात मात्र, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; दुपारी घराबाहेर पडणे टाळा
मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबई ठाण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; दुपारी घराबाहेर पडणे टाळा (PTI)

Mumbai heat wave update : राज्यात मुंबई, पुणे आणि ठाण्यात पुढच्या काही तासात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानात मोठी वाढ होणार आहे. मुंबईत सरासरी तापमान हे ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुपारी घराबाहेर पडण्यास टाळावे असे आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Mumbai Airport close : मुंबई विमानतळ ‘या’ कारणांमुळे ९ मे रोजी सहा तासांसाठी राहणार बंद राहणार

राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. एकीकडे अवकाळी पावसाचे ढग तर दुसरीकडे काही जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजस्थान, गुजरातवरून उष्ण वारे येत असून त्या सोबतच अरबी समुद्रावरून देखील आद्रर्तायुक्त उष्ण वारे किनारपट्टीच्या दिशेने येत असल्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईसह किनारपट्टीवर तापमानात वाढ होणार आहे. मुंबईत सोमवारी कमाल तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ नोंदवण्यात आली. तर राज्यात सर्वाधिक तापमान मालेगावचे होते. तर पुण्यात देखील तापमान हे ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे होते. पुढील दोन-तीन दिवस उष्णतेच्या झळा कायम राहणार आहे. तर मंगळवारी मुंबईसह किनारपट्टीला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Ram Navami bank Holiday : राम नवमीनिमित्त उद्या 'या' शहरात बँकांना सुट्टी; ऑनलाइन व्यवहारांना द्या प्राधान्य

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई व उपनगरांचे तापमान सोमवारी ४ अंशांनी वाढले. तर ठाणे जिल्ह्याचे तापमान हे सरासरी ४१ डिग्री अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

मुंबईकर झाले घामाघूम

मुंबई शहर, उपनगरांमध्ये सूर्य आग ओकत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यात आर्द्रता देखील जास्त असल्याने सर्वसामान्य मुंबईकर घामाघूम झाले आहेत. ऐरवी गजबजलेली असलेल्या मुंबईत सोमवारी उन्हामुळे तुरळक गर्दी जाणवत होती. वाढत्या उन्हामुळे नागरिकांची शीतपेयांची मागणी वाढली आहे.

PM Modi: प्रचारासाठी मोदी यांचा पुन्हा विदर्भ दौरा! पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा नागपूरला मुक्कामी थांबणार

ठाण्यात पारा वाढला

ठाण्यात देखील सकाळपासूनच उन्हाच्या झळा बसत असून दुपारनंतर रस्त्यावर शुकशुकाट होत असल्याची स्थिती आहे. उन्हाच्या झळा या पाच वाजेपर्यंत जाणवत होत्या. दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.

अशी घ्या काळजी

नागरिकांनी उन्हात बाहेर पडणे टाळावे. तसेच दिवसभर पाणी भरपूर पिण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे. या सोबतच चहा, कॉफी घेणे टाळावे लागणार आहे. तर त्या ऐवजी नारळपाणी, लिंबू सरबत किंवा थंड पाणी पिण्यास प्राधान्य द्यावे. जेवणात पचायला हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करा. तर दुपारी बाहेर जाणे टाळा. ऊनहयात जातांना छत्री, टोपी, स्कार्फचा वापर करा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर