मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एक-दोन गुण कमी मिळाले असते तर बरे झाले असते, चेहऱ्यावर उगवलेल्या केसांमुळे ट्रोलिगमुळे टॉपर मुलगी नाराज

एक-दोन गुण कमी मिळाले असते तर बरे झाले असते, चेहऱ्यावर उगवलेल्या केसांमुळे ट्रोलिगमुळे टॉपर मुलगी नाराज

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 27, 2024 11:07 PM IST

board10thresult : लाखों विद्यार्थ्यांना मागे सोडत सर्वाधिक गुण मिळवलेल्या प्राचीला तिच्या चेहऱ्यावर उगवलेल्या केसांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

दहावीतील टॉपर प्राची निगम
दहावीतील टॉपर प्राची निगम

उत्तर प्रदेश राज्यातील सीतापूर जिल्ह्यातील रहिवाशी प्राची निगमने यूपी बोर्ड १० वीच्या परीक्षेत टॉप केले आहे. लाखों विद्यार्थ्यांना मागे सोडत सर्वाधिक गुण मिळवलेल्या प्राचीला तिच्या चेहऱ्यावर उगवलेल्या केसांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या कारणामुळे ती खूपच दु:खी झाली आहे. तिने नैराश्येत म्हटले की, मला एक-दोन गुण कमी मिळाले असते तर बरे झाले असते. प्राचीने हायस्कूलच्या परीक्षेत टॉप करताना ६९९ पैकी ५९१ गुण मिळवले. तिला ९८.५० टक्के गुण मिळाले. 

ट्रेंडिंग न्यूज

दहावीच्या परीक्षेत टॉप करणाऱ्या प्राची निगमने माध्यमांशी बोलताना म्हटले की, माझ्या शारीरिक व्यंगाबाबतचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. लोक कमेंट करत आहेत की, ही कसली मुलगी. तिच्या चेहऱ्यावर केस उगवले आहेत. यामुळे ती सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर आली. तिने हताश होत म्हटले की, कदाचीत मला १-२ गुण कमी मिळाले असते तर इतकी प्रसिद्ध झाले असते व या ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला नसता. केसांमुळे मला चिढवले जात आहे. मी टॉपर झाल्यामुळे कदाचित लोकांनी पहिल्यांदाच पाहिले असेल की, मुलींच्या अंगावरही केस येतात. त्यामुळेच अशी कमेंट येत आहेत. 

प्राची निगमने म्हटले की, दरम्यान काही लोकांनी चांगल्या कमेंटही केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, हॉर्मोनल डिसीजमुळे चेहऱ्यावर केस येतात. मी पाहिले की, लोक मला ट्रोल करत आहेत. त्याचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही. कारण चेहऱ्यावरून मी आधीपासूनच लोकांचा सामना करत आहे. लोक जसा विचार करत आहेत, तशाच प्रकारच्या कमेंट करत आहेत. कोणी काही म्हणत असेल तर वाईट तर वाटतेच ना. 

काही दिवसांपूर्वी यूपी बोर्डच्या दहावीचे निकाल जाहीर झाले. यात प्राचीने टॉप केले. सीतापूरमधील बाल विद्या कॉलेजमधून तिने शिक्षण घेतले आहे. परीक्षा टॉप केल्यानंतर प्राचीने आनंद व्यक्त केला होता. प्राचीचे वडील महापालिकेच बांधकाम ठेकेदार आहेत. तर प्राचीची आई गृहिणी आहे. तिला एक छोटा भाऊ व बहिण असून ते हायस्कूलमध्ये शिकतात.

IPL_Entry_Point