मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Virginia Firing Incident : अमेरिकेत पदवीदान समारंभात तुफान गोळीबार, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Virginia Firing Incident : अमेरिकेत पदवीदान समारंभात तुफान गोळीबार, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 07, 2023 09:58 AM IST

Virginia Firing Incident : न्यूयॉर्क येथील गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता व्हर्जिनियात तुफान गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

Firing Incident In Virginia United States
Firing Incident In Virginia United States (HT_PRINT)

Firing Incident In Virginia United States : न्यूयॉर्क शहरात झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठात तुफान गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यापीठात पदवीदान सोहळा सुरू असतानाच हल्लेखोराने विद्यार्थ्यांवर हल्ला केला. आरोपीने केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आरोपी १९ वर्षीय असून त्याने गोळीबार का केला, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या साथीदारांचाही शोध घेतला आहे. अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या रिचमंड भागातील मनरो पार्कमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळं गोळीबाराच्या या धक्कादायक घटनेमुळं अमेरिकेत पुन्हा खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, व्हर्जिनिया विद्यापीठाचा पदवीदान सोहळा अल्ट्रिया थिएटरमध्ये सुरू होता. पास झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येत असतानाच एका हल्लेखोराने अचानक सभागृहातच गोळीबार करायला सुरुवात केली. त्यात पाच विद्यार्थ्यांना गोळ्या लागल्या आहे. त्यातील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीने झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांना विद्यापीठ परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पदवीदान सोहळा गोळीबाराच्या घटनेमुळे रद्द करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरात सातत्याने गोळीबार होत असल्याच्या घटना समोर येत आहे. यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता व्हर्जिनिया विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना समोर आल्याने यूएसमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

IPL_Entry_Point