मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Guhagar bus Accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-एसटी बसच्या धडकेत १ ठार, तर २३ जखमी

Guhagar bus Accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-एसटी बसच्या धडकेत १ ठार, तर २३ जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 07, 2023 08:29 AM IST

Guhagar vijaypur road bus truck Accident: गुहागर-विजयपूर महामार्गावरील जत तालुक्यातील मुचंडी येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि एसटीबस च्या धडक झाली असून या भीषण अपघातात १ प्रवाशी ठार तर २३ प्रवाशी जखमी झाले आहेत.

गुहागर-विजयपूर महामार्गावर भीषण अपघात
गुहागर-विजयपूर महामार्गावर भीषण अपघात

जत : गुहागर-विजयपूर महामार्गावरील जत तालुक्यातील मुचंडी येथे मंगळवारी भीषण अपघात झाला. कर्नाटक सीमेजवळ एका ट्रकने एसटी पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एसटी बसचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत एक जण ठार झाला असून २३ जण जखमी झाले आहेत. यातील १२ प्रवाशी गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Air India : मोठा अपघात टळला, अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, रशियात इमर्जन्सी लँडिंग

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आगाराची सांगोला-विजयपूर बस ही विजयपूरला निघाली होती. साईराज ट्रान्सपोर्टचा ट्रक हा साखर भरून विजयपूरला निघाला होता. सांगोला- विजयपूर बस कर्नाटक सीमेलगतच्या बसथांब्यावर प्रवासी उतरत होते.

 

याठिकाणी तीव्र उतार आहे. याच वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक थेट पाठीमागून एसटी बसला जोरधार धडकला. ही धडक एवढी जोरदार होती की बसचा चककचुर झाला. यात बस मधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर २३ जण गंभीर जखमी झाले. यातील १२ जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे. त्यांना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग