मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Live News Updates 3 June 2023 : ओडिशा रेल्वे अपघातात २८४ हून अधिक लोकांचा मृत्यू, ९०० प्रवासी जखमी

Live News Updates 30 May 2023(HT)

Live News Updates 3 June 2023 : ओडिशा रेल्वे अपघातात २८४ हून अधिक लोकांचा मृत्यू, ९०० प्रवासी जखमी

04:56 PM ISTJun 03, 2023 10:26 PM Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • Share on Facebook

Odisha Train Accident : हावडा ते चेन्नई धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वेचा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल २८४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० लोक जखमी झाले आहेत.

Sat, 03 Jun 202304:55 PM IST

JJ Hospital : डॉक्टर रागिणी पारेख यांच्या सेवानिवृत्तीचा अर्ज मंजुर

Ragini Parekh JJ Hospital : मुंबईतील प्रसिद्ध जेजे रुग्णालयातील नेत्रविभाग प्रमुख रागिणी पारेख यांनी काही दिवसांपूर्वीच मुदतपूर्व सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता जेजे रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या सेवानिवृत्तीचा अर्ज मंजूर केला आहे.

Sat, 03 Jun 202303:41 PM IST

Rahul Gandhi : विरोधकांच्या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधींची अनुपस्थित राहणार

Congress vs Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीसाठी सपा, आप, टीएमसी, राजद आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहे.

Sat, 03 Jun 202301:54 PM IST

Coromandel Express Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली जखमींची भेट, घटनास्थळाची केली पाहणी

Coromandel Express Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची रुग्णालायात भेट घेत विचारपूस केली आहे. तसेच रेल्वे अपघाताच्या घटनास्थळी मोदींनी पाहणी केली असून प्रशासनाला सर्व आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना केल्या आहे.

Sat, 03 Jun 202309:55 AM IST

Train Accident Odisha : ओडिशातील रेल्वे अपघातावर सोनिया गांधींचा शोक, म्हणाल्या...

Sonia Gandhi On Train Accident Odisha : ओडिशातील तीन रेल्वेचा अपघात झाल्याची घटना समोर आल्यानंतर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. ओडिशातील रेल्वे अपघाताची घटना अत्यंत वेदनादायी असून माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयासह असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

Sat, 03 Jun 202307:04 AM IST

Video पाहाः ओडिशातील रेल्वे अपघाताचे ताजे दृष्य

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. लष्कराचे जवान मदकार्यासाठी उतरले असून या अपघातात १००० प्रवासी जखमी झाले आहेत. 

Sat, 03 Jun 202305:23 AM IST

Sex Championship : 'या' देशात भरणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप; शारीरिक संबंधांना मिळाली खेळ म्हणून मान्यता

Sex Championship in Europe : जगभरात विविध खेळांना मान्यता मिळाली आहे. यात साहसी, बैठ्या तसेच घरगुती खेळांना देखील मान्यता मिळाली आहे. यानंतर आता शारीरिक संबंधाना देखील मान्यता मिळाली असून याची पहिली चॅम्पियनशिप ही यूरोपमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

Sat, 03 Jun 202304:43 AM IST

Gopinath Munde Death Anniversary : गोपीनाथ मुंडे यांचा आज नववा स्मृतिदिन

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज नववा स्मृतिदिन आहे. बीडमधील परळीच्या गोपीनाथ गडावर स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होत असतो. आज सुद्धा सकाळी कीर्तन, त्यानंतर दुपारी महाप्रसाद आणि त्यासोबतच आरोग्य शिबिर असे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.

Sat, 03 Jun 202304:14 AM IST

Odisha Train Accident : ''कुणाचे हात कापले गेले, तर कुणाचे पाय'' ओडिशाच्या रेल्वे अपघातातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबीती

Odisha Train Accident : शुक्रवारी संध्याकाळी उशिरा कोरोमंडल एक्सप्रेस आणि बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कसा झाला याची माहिती एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिली.

Sat, 03 Jun 202303:33 AM IST

Train accident in India : बिहारमध्ये नदीत कोसळून ८०० प्रवाशी झाले होते ठार; भारतातील भीषण रेल्वे अपघातांची पाहा यादी

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वेगाड्यांचा भीषण अपघात झाला. यात २३३ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रेल्वे अपघातानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) नऊ पथके अपघातस्थळी बचाव कार्यात गुंतलेली आहेत. ओडिशातील रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले की, घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशीही चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दरम्यान, या अपघातामुळे भारतातील आतापर्यंत झालेल्या भीषण अपघातांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Sat, 03 Jun 202302:05 AM IST

Pune : शिवसृष्टी प्रकल्पाला बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांची भेट

 बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज नऱ्हे, आंबेगाव येथे शिवसृष्टीला भेट देऊन पाहणी केली. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मुतालिक, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, तहसीलदार किरण सुरवसे आदी यावेळी उपस्थित होते.

Sat, 03 Jun 202302:04 AM IST

Pune : पुणे जिल्हा परिषदेला भारतीय लोक प्रशासन संस्थेचा स्व. एस. एस. गडकरी पुरस्कार

 सार्वजनिक प्रशासनात नवकल्पनांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने मानाच्या स्वर्गीय एस. एस. गडकरी पुरस्कारासाठी पुणे जिल्हा परिषदेची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता आणि कठोर परिश्रमाचा हा सन्मान आहे, अशी भावना प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.

Sat, 03 Jun 202301:20 AM IST

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातात २०७ हून अधिक लोकांचा मृत्यू, तर ९०० प्रवासी जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Odisha Train Accident : हावडा ते चेन्नई धावणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वेचा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल २०७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० लोक जखमी झाले आहेत.