Job Alert news update : रोजगार शोधणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतातील उद्योग आणि विविध कंपन्या जून महिन्याच्या तिमाहीत मेगा भरतीची योजना आखत आहेत. मॅनपॉवरग्रुपच्या ताज्या जॉब्स आउटलुक सर्वेक्षणानुसार, भारतातील ३६ टक्के कंपन्या पुढील तिमाहीत कर्मचारी नियुक्त करण्यासाठी भरतीचे नियोजन करणार आहेत.
या सर्वेक्षणावर आधारित अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये सुमारे ३ हजार १५० कंपण्याशी चर्चा करण्यात आली. अहवालानुसार, जगातील ४२ देशांमध्ये भारताची नोकर भरतीची स्थिती सर्वात मजबूत राहणार आहे. तर पुनरावलोकनाधीन कालावधीत, ५० टक्के रोजगार देणाऱ्या कंपन्या म्हणाल्या की कामगारांचे पगार वाढणार आहेत, तर १४ टक्के म्हणाले की पगार वाढ कमी अपेक्षित आहे, तर ३३ टक्के कंपन्या कोणत्याही बदलाची अपेक्षा करत नाहीत.
मॅनपॉवर ग्रुपने निवेदनात म्हटले आहे की, ३६ टक्के निव्वळ रोजगार निर्मितीसह भारत जगभरातील देशांच्या यादीत अव्वल राहणार आहे. भरतीदरम्यान कंपन्यांना टॅलेंटची कमतरता भासत आहे. एप्रिल-जून २०२३ च्या तुलनेत भारताचा निव्वळ रोजगाराचा दर ६ टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
अनेक व्यावसायिक संघ सदस्यांनी राजीनामा दिला आहे: स्पाइसजेट
स्पाइसजेटने मंगळवारी सांगितले की, विमान कंपनीच्या धोरणात्मक पुनर्रचनेचा भाग म्हणून त्यांच्या व्यावसायिक संघातील अनेक सदस्यांनी तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. सूत्रांनी सोमवारी सांगितले की एअरलाइनचे मुख्य परिचालन अधिकारी अरुण कश्यप आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी शिल्पा भाटिया यांनी राजीनामा दिला आहे. एअरलाइनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडील भांडवल वाढीसह, कंपनी मागील सर्व विवादांचे निराकरणाचा वेग वाढवणार असून महसूल आणि प्रवासी संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे.