मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal: केजरीवालांच्या अटकेनंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, राहुल गांधी म्हणाले घाबरलेला हुकूमशहा..

Arvind Kejriwal: केजरीवालांच्या अटकेनंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल, राहुल गांधी म्हणाले घाबरलेला हुकूमशहा..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 21, 2024 11:43 PM IST

Arvind Kejriwal Arrested :केजरीवाल यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. वाचा कोण काय-काय म्हणाले..

केजरीवालांच्या अटकेनंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
केजरीवालांच्या अटकेनंतर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना सक्तवसुली संचालनालय (ED) ने गुरुवारी अटक केली. केजरीवाल यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की, आता मुख्यमंत्र्यांना अटक होणे सामान्य बाब झाली आहे. याचा इंडिया आघाडी निधेष करते.

ट्रेंडिंग न्यूज

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एकाउंट एक्स वर लिहिले की, घाबरलेला हुकूमशहा एक मेलेली लोकशाही बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मीडियासह सर्व संस्थांवर नियंत्रण, पक्ष फोडणे, कंपन्यांकडून हफ्ता वसुली, प्रमुख विरोधी पक्षांचे खाते गोठवणे आदि या साक्षसी शक्तीला कमी होते म्हणून आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांची अटकही सामान्य बाब झाली आहे. INDIA आघाडी याचे जोरदार उत्तर देईल.

त्यापूर्वी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी यांनीही ED च्या कारवाईचा विरोध केला आहे. त्यांनी म्हटले की, राजकीय पातळी इतक्या खाली आणणे पंतप्रधानांना शोभा देते ना सरकारला.आपल्या टीकाकारांशी निवडणुकीच्या रंणागणात येऊन लढा. विरोधकांच्या धोरणांवर व कार्यशैलीवर टीका करा, हीच लोकशाही आहे. मात्र अशाप्रकारे देशातील सर्व संस्था आपल्या राजकीय स्वार्थासाठी कामाला लावणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे.

खर्गे काय म्हणाले?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हटले की, भाजप निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना येन केन प्रकारे कमजोर करण्याचा प्रयत्न करत हे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे बँक खाते सीज केल्याचा मुद्दाही उपस्थित केला. खर्गे म्हणाले जर तुम्हाला विजयाचा विश्वास असता तरसंविधानिक संस्थांचा गैरवापवर करून मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसची बँक खाती गोठवली नसती.

पिनरायी विजयन म्हणाले अटक आक्षेपार्ह -

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी म्हटले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक खूपच आपत्तिजनक आहे. ही कारवाई निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचा आवाज बंद करण्याच्या प्रयत्नांचा भाग आहे.

एमके स्टॅलिन म्हणाले..

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मागील दहा वर्षाचे अपयश झाकण्यासाठी व आपल्या पराभवाच्या भीतीने फॅसिस्ट भाजप सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करून घृणास्पद कृत्य केले आहे. हेमंत सोरेन यांच्यावर अन्याय केल्यानंतर केजरीवाल यांनाही टार्गेट केले गेले आहे.

भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असून लोकशाहीचा ऱ्हास होत आहे. भाजपच्या एकाही नेत्याला चौकशी किंवा अटकेचा सामना करावा लागत नाही.भाजपकडून केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे.

या अन्यायामुळे जनतेमध्ये भाजपविरोधात रोष उत्पन्न होत आहे. यामुळे इंडिया आघाडीला विजयाच्या वाटचालीला बळ मिळत आहे..

IPL_Entry_Point