Rahul Gandhi on Electoral bonds : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी, १७ मार्च रोजी मुंबईत समारोप झाला. यावेळी झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपनं देशभरत खंडणीची रॅकेट चालवली आहेत. कंपन्यांना कंत्राट मिळालं की भाजपला हप्ते पोहोचवले जातात. मुंबईतील एअरपोर्टचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीवर ईडी, सीबीआयचा छापा पडल्यानंतर रातोरात एअरपोर्ट एका कंपनीला दिलं गेलं, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.