आपचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यातील मनी लाँड्रिगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने आधी त्याच्या घराची झडती घेतली आणि नंतर त्यांची चौकशी केल्यानंतर तपास यंत्रणेने त्यांना अटक केली. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही अटकेची कारवाई केली.उद्या त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
सक्तवसुली संचलनालयाने दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने अरविंद केजरीवालांना आतापर्यंत ९ समन्स बजावले होते. मात्र ते एकदाही ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. ईडीच्या अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी केजरीवालांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती, न्यायालयाने ईडीच्या कोणत्याही कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर आज अचानक ईडीचे पथक केजरीवालांच्या घरी दाखल झाले. यावेळी केजरीवालांची त्यांच्या घरात दोन तास चौकशी झाली आणि चौकशीनंतर ईडीची टीम केजरीवालांना ताब्यात घेतले.
केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की ते केजरीवाल मुख्यमंत्रिपदावर कायम राहतील, ते राजीनामा देणार नाही. केजरीवाल सरकारमधील मंत्री आतिशी म्हणाल्या की, केजरीवाल मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील. तसेच, या अटकेविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, केजरीवालांच्या अटकेनंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत.