Cow Hug Day : विरोधकांच्या टीकेनंतर मोदी सरकारची माघार; ‘काऊ हग डे’चा वादग्रस्त निर्णय रद्द-cow hug day canceled by central animal welfare board modi govt today see details ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cow Hug Day : विरोधकांच्या टीकेनंतर मोदी सरकारची माघार; ‘काऊ हग डे’चा वादग्रस्त निर्णय रद्द

Cow Hug Day : विरोधकांच्या टीकेनंतर मोदी सरकारची माघार; ‘काऊ हग डे’चा वादग्रस्त निर्णय रद्द

Feb 10, 2023 06:12 PM IST

Cow Hug Day Decision : येत्या १४ फेब्रुवारीला कृतज्ञता म्हणून गायीला मिठी मारण्याचं आवाहन पशु कल्याण मंडळानं केलं होतं. त्यानंतर आता हा निर्णय मोदी सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.

Modi Govt On Cow Hug Day
Modi Govt On Cow Hug Day (HT)

Modi Govt On Cow Hug Day : व्हॅलेटाइन्सडेच्या दिवशी गायीला मिठी मारण्याचं आवाहन करणारं परिपत्रक केंद्रीय पशु कल्याण मंडळानं काढलं होतं. त्यानंतर आता त्यावरून विरोधकांनी सरकारला खडेबोल सुनावल्यानंतर मोदी सरकारनं अखेरीस माघार घेत वादग्रस्त 'काऊ हग डे' साजरा करण्याचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या पशु कल्याण मंडळानं नवीन पत्रक जारी करत 'काऊ हग डे' साजरा करण्याचं आवाहनपत्र रद्द करत असल्याचं जाहीर केलं आहे.

प्रेम करणाऱ्यांसाठी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेटाइन्स डे साजरा केला जातो. परंतु भारतीय संस्कृतीचा संदर्भ देत पशु कल्याण मंडळानं व्हॅलेटाइन्सडेच्या दिवशी गायींना मिठी मारण्याचं वादग्रस्त आवाहन केलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांसह नेटकऱ्यांनी 'काऊ हग डे' ची खिल्ली उडवल्यानंतर आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. पशु कल्याण मंडळाच्या निर्णयामुळं आता केंद्र सरकारची चांगलीच गोची झाली आहे.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या आक्रमणामुळं आणि भारताच्या ग्रामीण संस्कृतीत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत गायींचं मोठं महत्त्वाचं स्थान असल्यामुळं देशभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेटाइन्सडेच्या ऐवजी गायींना मिठी मारत कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन काही दिवसांपूर्वी केंद्रीय पशु कल्याण मंडळाकडून करण्यात आलं होतं. त्यावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलसह अनेक पक्षाच्या नेत्यांनी टीका केली होती. परंतु आता पशु कल्याण मंडळानं परिपत्रक मागे घेत निर्णय रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.

Whats_app_banner