मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: ‘आधुनिक रेल्वेच्या इतिहासात एकाच व्यक्तीचं नाव...’, फडणवीसांकडून पीएम मोदींचं तोंडभरून कौतुक

Mumbai: ‘आधुनिक रेल्वेच्या इतिहासात एकाच व्यक्तीचं नाव...’, फडणवीसांकडून पीएम मोदींचं तोंडभरून कौतुक

Feb 10, 2023 07:18 PM IST

Devendra Fadnavis : वंदे भारत रेल्वे ही एक प्रकारे चमत्कारच आहे. ही रेल्वे देशातील अनेक शहरांमध्ये धावेल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Devendra Fadnavis On PM Narendra Modi
Devendra Fadnavis On PM Narendra Modi (HT)

Devendra Fadnavis On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पीएम नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यानंतर उपस्थितांशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात करत वंदे भारत रेल्वेचं महत्त्व सांगितलं आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात एकच नाव लिहिलं जाईल, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अशा शब्दांत फडणवीसांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

वंदे भारत रेल्वे भारतात धावेल, याची कुणीही कल्पना केली नव्हती. ही एक्स्प्रेस एक चमत्कार असून देशातील अनेक शहरांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची सुरुवात करण्यात आली आहे. पहिली रेल्वे मुंबई ते शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर अशी सुरू करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं आई तुळजा भवानी, सिद्धेश्वर, महाराष्ट्राची देवता विठ्ठल आणि स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद घेता येणार असल्यामुळं भाविकांसाठी वंदे भारत एक्स्प्रेस मैलाचा दगड ठरणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी १३ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. आम्ही याबाबत कधी ऐकलं किंवा विचारही केला नव्हता. महाराष्ट्रात सध्या १२४ रेल्वे स्थानकं तयार केली जात असून सीएसटीलाही विकसित केलं जात आहे. त्यामुळं रेल्वेच्या आधुनिक इतिहासात एकच नाव लिहिलं जाईल ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असेल. असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४