मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  sanatan dharma : सनातन धर्माच्या वादात खर्गेंच्या मुलाची उडी; म्हणाले.. ‘धर्म हा रोगासारखा आहे’

sanatan dharma : सनातन धर्माच्या वादात खर्गेंच्या मुलाची उडी; म्हणाले.. ‘धर्म हा रोगासारखा आहे’

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 04, 2023 02:56 PM IST

controversy over sanatan dharma : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक प्रियांक खर्गे यांनी देखील या वादात उडी मारली आहे.

प्रियांक खर्गे
प्रियांक खर्गे

controversy over sanatan dharma : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्यातील मंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केले आहे. यावरून गदारोळ सुरू असतांना आता या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यानेही उडी मारली आहे. त्यांनी देखील सनातन धर्माविरोधात टीकेच्या सुरात सुर मिळवला आहे. त्यांनी सनातन धर्माचा थेट उल्लेख टाळत ही टीका केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

harish salve : प्रख्यात वकील हरीश साळवे वयाच्या ६८ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नबंधनात, कोण आहे तिसरी पत्नी?

कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असेले प्रियांक खर्गे यांना सनातन धर्म आणि उदयनिधी यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, जो धर्म समतेचा पुरस्कार करत नाही आणि माणूस म्हणून तुमचा आदर करत नाही, तो धर्म नाही. प्रियांक खर्गे म्हणाले, कोणताही धर्म जो समान अधिकार देत नाही आणि तुम्हाला माणसासारखी वागणूक देत नाही तो एका आजारापेक्षा कमी नाही.

Pune Crime : पोलिस कर्मचाऱ्याची तक्रार देण्यास गेलेल्या महिला पोलीस अधिकार्‍यांवर भर पोलीस चौकीत हल्ला

उदयनिधी यांनी सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाची केली होती तुलना

एमके स्टॅलिन यांच्या मुलाने सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती. एवढेच नाही तर अशा धर्माचे उच्चाटन केले पाहिजे असे देखील ते म्हटले. उदयनिधी हे राज्याचे युवा कार्य आणि क्रीडा मंत्री आहेत. याशिवाय ते लेखन, दिग्दर्शन आणि चित्रपटांमध्ये अभिनय देखील करतात. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याशिवाय त्याच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. सनातन धर्माबद्दल स्टॅलिन म्हणाले की, काही गोष्टी अशा आहेत की त्याला विरोध करणे पुरेसे नाही. आपण त्याचे समूळ उच्चाटन करायला हवे. डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण विरोध करू शकत नाही पण त्यांचा नायनाट करणे आवश्यक आहे. सनातन धर्मही असाच आहे, असे स्टॅलिन म्हणाले होते.

Chandrayaan 3 : विक्रम लँडरने चंद्रावर मारली उडी! आधी इंजिन सुरू केले यांनी मग... इस्रोने दिली मोठी अपडेट

उदयनिधी यांनी यानंतर सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम राहिले. ते म्हणाले की, विशिष्ट धर्माचे पालन करणार्‍या लोकांचे उच्चाटन करण्याबद्दल ते बोलत नव्हते. सनातन धर्म जातीच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडतो, असेही ते म्हणाले. त्यांनी ज्या कार्यक्रमात भाग घेतला त्या कार्यक्रमाचे शीर्षकही 'सनातन को खमन करना' असे होते.

उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. भारतातील ८० टक्के लोक सनातन धर्मावर विश्वास ठेवतात. भाजपनेही काँग्रेसवर निशाणा साधत द्रमुक दीर्घकाळ काँग्रेसचा मित्रपक्ष असल्याचे म्हटले आहे. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर यावर एकमत झाले आहे का? उदयनिधींच्या या विधानाला देशातील संत समाजानेही विरोध केला. ते म्हणाले की, शतकानुशतके चालत आलेला सनातन पंथ नष्ट होऊ शकत नाही. तो नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे अनेक लोक आले आणि गेले पण सनातन धर्म कायम राहिला आहे.

IPL_Entry_Point

विभाग