मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chandrayaan 3 : विक्रम लँडरने चंद्रावर मारली उडी! आधी इंजिन सुरू केले यांनी मग... इस्रोने दिली मोठी अपडेट

Chandrayaan 3 : विक्रम लँडरने चंद्रावर मारली उडी! आधी इंजिन सुरू केले यांनी मग... इस्रोने दिली मोठी अपडेट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 04, 2023 02:00 PM IST

Chandrayaan 3 : चंद्रयान ३ मोहिमेतील सर्व उद्दिष्टे साध्य झाली असताना आज विक्रम लँडरने चंद्रावर अनोखा प्रयोग केला. विक्रम लँडरने आपले इंजिन सुरू करून पुन्हा छोटे उड्डाण करून चंद्रावर छोटी उडी मारत पुन्हा लॅंडींग केले.

Chandrayaan 3
Chandrayaan 3

Chandrayaan 3 : चंद्रयान ३ मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण झाले असतांना आज इस्रोने महत्वाची अपडेट दिली आहे. चंद्रावर असलेल्या विक्रम लँडरने आपले इंजिन पुन्हा सुरू करून तब्बल ४० मीटर पर्यंत हवेत उड्डाण करून पुन्हा जवळ ३० ते ४० मीतर अंतरावर लॅंडींगचा यशस्वी प्रयोग केला. या प्रयोगाला हॉप एक्सप्रीमेंट म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या प्रयोगाआधी विक्रम लँडरचे रॅम्प आणि दोन्ही उपकरणे पूर्वस्थितीत आणली गेली. लँडरचे इंजिन सुरू करून त्याला जमिनीपासून ४० सेंटीमीटर वर उचलण्यात आले आणि मूळ जागेपासून ३० - ४० सेंटीमीटर दूर पुन्हा अलगद उतरवण्यात आले. लँडर पुन्हा जमिनीवर उतरवल्यावर रॅम्प आणि उपकरणे पुन्हा उघडण्यात आली. हा प्रयोग झाल्यावरही सर्व यंत्रणा उत्तम स्थितीत आहेत. भविष्यातील मानवी मोहिमा आणि चंद्रावरून पृथ्वीवर नमुने आणण्याच्या दृष्टीने या प्रयोगाचे महत्व असल्याचे इस्रोने म्हटले आहे.

harish salve : प्रसिद्ध वकील हरीश साळवे वयाच्या ६८ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न बंधनात

'विक्रमचे चंद्रावर पुन्हा सॉफ्ट लँडिंग झाले असून हे मोहे यश असल्याचे इस्रोने म्हटले आहे. विक्रम लँडरचे दुसरे सॉफ्ट लँडिंग महत्वाचे आहे कारण यामुळे भविष्यातील चंद्रावरून नमुने परत घेऊन परतण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दरम्यान, येत्या एक ते दोन दिवसांत चंद्रावर अंधार पडणार आहे. तब्बल पुढील १५ दिवस विक्रम लँडर आणि रोव्हर चंद्राच्या अंधारात राहणार आहेत. २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानचे यशस्वी लँडिंग करण्यात आले होते. तब्बल १४ दिवसांपासून या यांनाने चंद्रावर विविध प्रयोग केले.

चांद्रयान फक्त दिवसा काम करत असेल. चंद्रावरील १४ दिवसांची रात्र संपल्यावर पुन्हा दिवस उजाडल्यावर हे यान पुन्हा सक्रिय होऊ शकेल का ? असा महत्त्वाचा प्रश्न विचारला जात आहे. इस्रोच्या सूत्रांचे म्हणणे आहे की चांद्रयानचे लँडर आणि रोव्हर सौर पॅनेलने सुसज्ज आहेत, जे सूर्यप्रकाशावर चालतात. यासाठी त्यांना सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. जर सूर्यप्रकाश नसेल तर त्यांचे सौर पॅनेल काही तासच टिकतील. मात्र, पुन्हा ऊन पडल्यावर ते सक्रिय होतील की नाही याची पुष्टी झालेली नाही. तसे झाले तर ही इस्रोसाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.

IPL_Entry_Point