मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  harish salve : प्रख्यात वकील हरीश साळवे वयाच्या ६८ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नबंधनात, कोण आहे तिसरी पत्नी?

harish salve : प्रख्यात वकील हरीश साळवे वयाच्या ६८ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नबंधनात, कोण आहे तिसरी पत्नी?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 04, 2023 02:14 PM IST

lawyer harish salve wedding : प्रसिद्ध वकील हरिश साळवे हे वयाच्या ६८ व्या वर्षी पुन्हा लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनाक्षी होते. दोघांचे लग्न जवळपास ३८ वर्षे टिकले, मात्र जून २०२० मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

lawyer harish salve wedding
lawyer harish salve wedding

lawyer harish salve wedding news : सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध वकील तसेच देशातील बड्या आणि प्रभावशाली व्यक्तिंपैकी एक असलेले पद्मभूषण हरिश साळवे हे वयाच्या ६८ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव त्रिना असून लंडनमध्ये झालेल्या त्यांच्या भव्य विवाहसोहळ्यात नीता अंबानी, ललित मोदी यांसारखे अनेक बडे उद्योगपती आणि राजकारणी देखील त्यांच्या लग्नाला उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये साळवे आणि बीना हे एकत्र दिसत आहेत. वकील कुमार मिहिर मिश्रा यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर साळवे यांच्या लग्न समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.

पहिले लग्न ३८ वर्षे टिकले

वकील साळवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनाक्षी असून दोघांचे लग्न जवळपास ३८ वर्षे टिकले, मात्र जून २०२० मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. साळवे यांना पहिल्या पत्नी पासून साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर साळवी यांनी ब्रिटिश कलाकार कॅरोलिन ब्रॉसार्डशी ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न केले होते. मात्र, हे लग्न काही काळच टिकले.

Pune University : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात तुफान राडा

साळवे हे प्रसिद्ध वकील आहेत. सुप्रीम कोर्टातील अनेक मोठे खटले त्यांनी लढवले आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव, सलमान खानच्या हिट अँड रन अँड ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरने देखील त्यांनी हाताळले आहेत. याशिवाय त्यांनी टाटा समूह, मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी यांसारख्या मोठ्या कंपन्याना देखील ते कायद्याचे सल्ले देतात. त्यांची मोठी प्रकरणे साळवे यांनी कोर्टात लढली आहेत.

साळवे हे देशातील सर्वात मोठे वकील मानले जातात. नोव्हेंबर १९९९ ते नोव्हेंबर २००२ पर्यंत ते सॉलिसिटर जनरल होते. जानेवारीमध्ये त्यांना वेल्स आणि इंग्लंडमध्ये राणीचे सल्लागार बनवण्यात आले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबी केले आणि १९९२ मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली होती.

IPL_Entry_Point

विभाग