मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पोलिस कर्मचाऱ्याची तक्रार देण्यास गेलेल्या महिला पोलीस अधिकार्‍यांवर भर पोलीस चौकीत हल्ला

Pune Crime : पोलिस कर्मचाऱ्याची तक्रार देण्यास गेलेल्या महिला पोलीस अधिकार्‍यांवर भर पोलीस चौकीत हल्ला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 04, 2023 02:23 PM IST

Pune Crime news : विनयभंगाची तक्रार मागे घेतल्यावर देखील त्रास देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यावर पोलिस चौकीत हल्ला करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

Pune Crime News Marathi
Pune Crime News Marathi (HT)

पुणे : पुण्यात महिला पोलिस अधिकारी देखील सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला पोलिस अधिकाऱ्याने विनयभंगांची तक्रार मागे घेतल्यावर देखील त्यांना त्रास होत असल्याने पुन्हा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिला अधिकाऱ्यावर पोलिस ठण्यातच हल्ला करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Chandrayaan 3 : विक्रम लँडरने चंद्रावर मारली उडी! आधी इंजिन सुरू केले यांनी मग... इस्रोने दिली मोठी अपडेट

निलेश आंद्रेस भालेराव (रा. कोले कल्याण पोलीस वसाहत, कलिना, सांताक्रुझ, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका महिला पोलीस निरीक्षकांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना सिंहगड रोडवरील अभिरुची पोलीस चौकीच्या दारात रविवारी दुपारी पावणे तीन वाजता घडली.

harish salve : प्रख्यात वकील हरीश साळवे वयाच्या ६८ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नबंधनात, कोण आहे तिसरी पत्नी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश भालेराव हा मुंबईत फोर्स वन मध्ये कार्यरत आहे. फिर्यादी या एमआयए येथे २०१८ मध्ये नेमणुकीला होत्या. त्यावेळी आरोपी निलेश हा फोर्स वनचे ट्रेनिंगसाठी त्या ठिकाणी आला होता. दरम्यान, त्याने फिर्यादी यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणून त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित महिला पोलिस अधिकाऱ्याने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आरोपीच्या घरच्यांच्या विनंतीवरुन पीडित महिला अधिकाऱ्याने गुन्हा मागे घेतला होता. असे असतांना देखील आरोपी नीलेश निलेश भालेराव हा त्यांना त्रास देत होता. हा त्रास सहन न झाल्याने पीडित महिला अधिकारी त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अभिरुची पोलीस चौकीत गेल्या होत्या.

|#+|

पोलिसांनी अदखलपात्र तक्रार घेतल्यानंतर त्या पतीसमवेत घरी जाण्यास जात असतांना आरोपी निलेश तेथे आला. यावेळी त्याने महिला अधिकाऱ्याला धमकावत तुम्ही हे काही बरोबर केले नाही, माझा त्रास तुम्ही वाढवला, असे मोठ्याने ओरडून फिर्यादी अधिकारी या बाहेर आल्या असता त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांना शिवीगाळ देखील केली. यावेळी पोलीस चौकीतील पोलिसांनी तातडीने निलेश भालेराव याला पडून त्याला अटक केली.

IPL_Entry_Point

विभाग