मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Elections Result : सीमाभागातील मराठी भाषिकांची काँग्रेसला पसंती, बेळगावात भाजपचा सुपडा साफ

Karnataka Elections Result : सीमाभागातील मराठी भाषिकांची काँग्रेसला पसंती, बेळगावात भाजपचा सुपडा साफ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 13, 2023 06:27 PM IST

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.

Karnataka Assembly Elections 2023 Live Updates
Karnataka Assembly Elections 2023 Live Updates (Shashidhar Byrappa)

Karnataka Assembly Elections 2023 Live Updates : कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने आतापर्यंत १२३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तसेच काँग्रेसचे १३ उमेदवार अद्यापही आघाडीवर आहेत. त्यामुळं आता कर्नाटकातील इतिहासात काँग्रेसचा आजवरचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. भाजपाने ५८ जागा जिंकल्या असून सहा ठिकाणी भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळं आता ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाला कर्नाटकात मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागांमध्येही काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. मराठी भाषिकांनी भाजप तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना नाकारत थेट काँग्रेसला पसंती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कर्नाटकची उपराजधानी असलेल्या बेळगाव जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील ११ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला असून भाजपला सात जागांवर समाधान मानावं लागलं आहे. महाराष्ट्रातील भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कर्नाटकातील सीमावर्ती भागांमध्ये जोरदार प्रचार केला होता. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदावरही रिंगणात उतरले होते. त्यामुळं आता कर्नाटकातील मराठी भाषिक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळाल्यामुळं त्याचा महाराष्ट्रातील राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता बेळगावसह निपाणी, कारवार आणि अन्य मराठी भाषिक प्रांतातील विजयामुळं काँग्रेसचं बळ वाढणार आहे.

काँग्रेसने बेळगाव ग्रामीण, यमकनमर्डी, चिकोडी, कागवाड कुडची, कारवार यांसह एकूण ११ विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. तसेच भाजपने सात जागांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळं आता कर्नाटकात बहुमत मिळाल्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई-कर्नाटक, हैदराबाद-कर्नाटक आणि कर्नाटकातील किनारी भागांमध्येही काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.

IPL_Entry_Point