मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MLA Disqualification : शिंदे अपात्र ठरल्यास नवा मुख्यमंत्री कोण?, मोदी-शहांकडून या चार नावांची चाचपणी

MLA Disqualification : शिंदे अपात्र ठरल्यास नवा मुख्यमंत्री कोण?, मोदी-शहांकडून या चार नावांची चाचपणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 22, 2023 07:43 AM IST

MLA Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दिल्लीत दाखल झाले असून आमदारांच्या अपात्रतेबाबत ते तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

Eknath Shinde Disqualification News Today
Eknath Shinde Disqualification News Today (HT_PRINT)

Eknath Shinde Disqualification News Today : सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटीस जारी केली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही राहुल नार्वेकर यांनी नोटीस जारी केली असून येत्या काही दिवसांतच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. याशिवाय एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार?, यावरही भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र केल्यास महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. त्यासाठी भाजपकडून नव्या नावांची चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यास त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी एका नेत्याच्या नावाची वर्ण लागणार असल्याचं वृत्त एका मराठी वृत्तपत्राने दिलं आहे. भाजपमध्या सध्या या सर्व नेत्यांच्या नावावर चर्चा सुरू असून एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतं.

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला मराठा चेहरा हवाय?

महाराष्ट्रात २०१४ साली सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने बिगरमराठा नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मराठा नेत्यांना एकमागून एक पक्षात प्रवेश दिला. परंतु आता २०२४ च्या पूर्वी भाजपने मराठा नेत्याच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्याचा प्लॅन केल्याची चर्चा आहे. चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांसारख्या नेत्यांनाही राज्यात महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांची थेट महसूलमंत्रीपदी वर्णी लागली होती. त्यानंतर आता शिंदेंचं पद गेल्यास राधाकृष्ण विखे यांचंही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आल्याचं पाहायला मिळत आहे.

IPL_Entry_Point