मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ravi Jadhav Birthday: जाहिरात कंपनीत काम करणाऱ्या रवी जाधव यांनी का घेतला होता चित्रपट करण्याचा निर्णय?

Ravi Jadhav Birthday: जाहिरात कंपनीत काम करणाऱ्या रवी जाधव यांनी का घेतला होता चित्रपट करण्याचा निर्णय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Sep 22, 2023 07:33 AM IST

Happy Birthday Ravi Jadhav: मुंबईतील एक सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रवी जाधव यांनी जाहिरात कंपनीत नोकरी करण्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

Ravi Jadhav
Ravi Jadhav

Happy Birthday Ravi Jadhav: मराठी मनोरंजन विश्वात आपल्या दमदार कलाकृती सादर केल्यानंतर आता हिंदी चित्रपट जगत गाजवायला सज्ज झालेला मराठमोळा दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव. ‘नटरंग’, ‘बालक पालक’, ‘टाईमपास’ अशा एकापेक्षा एक भन्नाट चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या रवी जाधव यांचा आज (२२ सप्टेंबर) वाढदिवस आहे. रवी जाधव हे जरी आज मनोरंजन विश्वातील मोठं नाव असलं तरी इथवर पोहोचण्याचा त्यांचा प्रवास अतिशय खडतर आहे. मुंबईतील एक सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रवी जाधव यांनी जाहिरात कंपनीत नोकरी करण्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

रवी जाधव यांनी मुंबईच्या प्रसिद्ध जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि ग्राफिक डिझायनिंगचे शिक्षण घेतले होते. यानंतर त्यांनी आपल्या कामाची सुरुवात एका जाहिरात कंपनीत नोकरी करून केली. या जाहिरात कंपनीत ते कॉपीरायटर आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहत होते. कलेची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. त्यांचा जन्म वरळीचा... तर, वडील मिल कामगार. यामुळे त्यांच्या आजूबाजूला कलात्मक वातावरण होतच. लहानपणी दादा कोंडके यांचे चित्रपट, मच्छिंद्र कांबळी यांची नाटकं बघूनच ते मोठे झाले. मात्र, जेव्हा स्वतः रवी जाधव यांनी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेण्याचा विचार केला, तेव्हा त्यांना घरून काहीसा विरोधही झाला होता.

Lalbaugcha Raja: शाहरूख खान आणि त्याचा मुलगा अबराम लालबागचा राजाच्या चरणी लीन

पण म्हणतात ना की, ठरवलं की करून दाखवावंच, तसंच रवी जाधव यांनी केलं. जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडल्यानंतर त्यांनी १२ वर्ष काम केलं. दरम्यान, त्यांनी अनेक जाहिराती तयार केल्या होत्या. याच कंपनीत काम करत असताना त्यांनी एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात गणपत पाटील यांना पुरस्कार मिळाला होता. प्रेक्षकांच्या रांगेत बसून हा सोहळा पाहणाऱ्या रवी जाधव यांना गणपत पाटील यांच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवावा, असा विचार आला. यानंतर त्यांनी चित्रपट तयार करण्याचा विचार करून नोकरीचा राजीनामा दिला.

चित्रपट बनवण्याचा असा कोणताही अनुभव नव्हता. पण, जर चित्रपट नाही चालला तर आपण पुन्हा नोकरीकडे वळू, असा निर्णय त्यांनी घेतला होता. प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी ‘नटरंग’ हा चित्रपट तयार केला. त्यांचा हा चित्रपट तुफान चालला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. रवी जाधव यांनी आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग