मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Lalbaugcha Raja: शाहरूख खान आणि त्याचा मुलगा अबराम लालबागचा राजाच्या चरणी लीन

Lalbaugcha Raja: शाहरूख खान आणि त्याचा मुलगा अबराम लालबागचा राजाच्या चरणी लीन

Sep 21, 2023 11:13 PM IST

Ganesh Chaturthi 2023: शाहरूख खान आणि त्याचा मुलगा अबराम यांनी आज लालबागचा राजाचे दर्शन घेतले.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan Darshan Of Lalbaugcha Raja: लालबागचा राजाचे आणि बॉलिवूड सेलिब्रेटी यांचे खूप जुने नाते आहे. दरवर्षी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटी लालबागचा राजाच्या पायावर डोक ठेवतात. यात बॉलिवडू स्टार शाहरूख खान आणि त्याचा मुलगा अबरामच्या उपस्थितीने हजारो भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या किंग खान त्याच्या जवान चित्रपटामुळे तुफान चर्चेत आहे. देशभरात त्याच्या नावाची चर्चा रंगली.

ट्रेंडिंग न्यूज

शाहरुख खानने आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी त्याचा मुलगा अबराम खानदेखील त्याच्यासोबत होता. शाहरुखचा छोटा मुलगा अबराम हा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. यावेळी शाहरुख खानने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. डोळ्यांवर गॉगल आणि केस बांधलेल्या लूकमध्ये शाहरुखने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहरुख खानला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली.

शाहरूख खान त्याचा चित्रपट जवानमुळे खूप चर्चेत आहे. जवान चित्रपटाने बॉक्स ५०० कोटींची कमाई केली. यापूर्वी शाहरुखच्या पठान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानंतर जवान चित्रपटाचे अभूतपूर्व यश आहे. जवान चित्रपट पाहण्यासाठी अजूनही लोक सिनेमागृहात प्रचंड गर्दी करत आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग