Ghar Banduk Biryani: ‘घर बंदूक बिर्याणी' सिनेमा घर बसल्या पाहायचा? जाणून घ्या कधी आणि कुठे
Nagraj Manjule: ज्या प्रेक्षकांनी ‘घर बंदूक बिर्याणी' थिएटरमध्ये पाहिलेला नाही त्यांच्यासाठी ही खास बातमी आहे.
चौकटीबाहेरचा चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे हे समीकरण सर्वांनाच माहिती आहे. त्यांचा 'घर बंदूक बिर्याणी' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. आता हा सिनेमा घर बसल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'घर बंदूक बिरयानी' असा एकमेव मराठी चित्रपट आहे जो एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट घर बसल्या पाहायला मिळणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटात पोलीस आणि डाकू यांच्यामधील चकमक दाखवण्यात आली होती. तसेच दुसरीकडे एक खुलणारी प्रेम कहाणी देखील दाखवण्यात आली होती. या चित्रपटातील आहा हेरो हे गाणे विशेष गाजले. आता हा सिनेमा २४ सप्टेंबर रोजी झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
वाचा: एकही गणपती न पाहता जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा..’ गाणं!
याचित्रपटाविषयी निर्माते नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात, "चित्रपटाबद्दल फारसे काही सांगणार नाही. चित्रपटाची कथा चांगली आहे, त्यानुसार गाण्यांचेही लेखन झाले आहे आणि त्याला साजेसे असे संगीत आहे. या चित्रपटात नेमके काय आहे, हे प्रेक्षकांना २४ सप्टेंबरलाच कळेल."
पुढे ते म्हणाले की, "बिर्याणीमध्ये सगळे जिन्नस असतात आणि त्याची प्रत्येकाची एक खासियत असते, जी बिर्याणीला अधिक चविष्ट बनवतात' तशीच या चित्रपटात विविध प्रकारची गाणी आहेत, जी संगीतप्रेनींना नक्कीच आवडतील आणि मुळात नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी ही खासच असतात. तशीच ‘घर बंदूक बिरयानीतीलही आहेत.’"
विभाग