मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bal Shivaji : लहान असो वा मोठा वाघ 'वाघच' असतो! रवी जाधव यांच्या 'बाल शिवाजी'चे पोस्टर प्रदर्शित

Bal Shivaji : लहान असो वा मोठा वाघ 'वाघच' असतो! रवी जाधव यांच्या 'बाल शिवाजी'चे पोस्टर प्रदर्शित

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jun 06, 2023 01:42 PM IST

Bal Shivaji Poster Out : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त 'बाल शिवाजी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

Bal Shivaji Marathi movie
Bal Shivaji Marathi movie

Bal Shivaji Poster Out : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त 'बाल शिवाजी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात ‘सैराट’ फेम अभिनेता आकाश ठोसर ‘बाल शिवाजीं’च्या भूमिकेत दिसणार आहे. ६ जून १६८४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मराठा स्वराज्याचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. याच निमित्ताने निर्माते संदीप सिंग, 'एव्हीएस स्टुडिओ' आणि रवी जाधव यांनी आकाश ठोसर अभिनित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेल्या ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे.

'बाल शिवाजी' हा चित्रपट बिग बजेटमध्ये बनवण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. 'बाल शिवाजी' चित्रपटात शिवरायांचा वयवर्षं १२ ते १६ पर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या रंजक गोष्टी पाहायला मिळतील.

चित्रपट निर्माते संदीप सिंग याबाबत म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येकजण ओळखतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाबद्दल फारशी माहिती नाही. रवी जाधवजींनी याबाबत कथा सांगितल्यावर मी मंत्रमुग्ध झालो. ही कथा आई आणि मुलाची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जगातील सर्वात निर्भय आणि शूर योद्धा त्यांनी कसे बनवले गेले, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.’

Adipurush: ‘आदिपुरुष’च्या रिलीज आधीच कलाकार बालाजीच्या चरणी; चित्रपटाच्या यशासाठी घातलं साकडं!

संदीप सिंह पुढे म्हणाले की, ‘जेव्हा मी सैराट पाहिला, तेव्हा मला माहित होते की स्क्रीनवरील नवीन मुलाकडे लाखो चाहत्यांना खुर्चीत खिळवून ठेवण्याची क्षमता आहे. हे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने सिद्धही करून दाखवले. आमच्या मते, आकाश ठोसरशिवाय कोणीही बाल शिवाजींची भूमिका करू शकत नाही.’

दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले की, ‘माझा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे आई-वडील, जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांनी लहानपणी त्यांचा भक्कम पाया रचून दिलेले अमूल्य योगदान दाखवेल. तसेच, लहानपणापासूनच एक योद्धा आणि शासक म्हणून त्यांची कौशल्ये कशी तीक्ष्ण झाली हे दाखवेल. मी गेली नऊ वर्ष या स्क्रिप्टवर काम केले आहे. दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपट करणार आहे. चित्रपटाची कथा संदीप सिंग यांनी समजून घेतली. मुख्य भूमिकेसाठी आकाश ठोसरची आम्ही एकमताने निवड केली. तरुण राजाची भूमिका साकारण्यासाठी त्याच्याकडे राजसी रूप आणि व्यक्तिमत्त्व आहे. या भूमिकेसाठी त्याचा उत्साह आणि उत्सुकता पाहून मी प्रभावित झालो आहे.’

'बाल शिवाजी' चित्रपटाची निर्मिती संदीप सिंग, सॅम खान, रवी जाधव, विशाल गुरनानी, जुही पारेख मेहता आणि अभिषेक व्यास यांनी केली आहे. लिजेंड स्टुडिओ, एव्हीएस स्टुडिओ आणि रवी जाधव फिल्म्स यांच्या बॅनरखाली बनत असलेल्या 'बाल शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करणार असून चिन्मय मांडलेकर आणि रवी जाधव यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण वर्षाअखेरीस सुरू होईल.

IPL_Entry_Point