मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Swara Bhasker: लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांनी स्वरानं दिली गुडन्यूज! फ्लाँट केला बेबी बंप

Swara Bhasker: लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांनी स्वरानं दिली गुडन्यूज! फ्लाँट केला बेबी बंप

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jun 06, 2023 01:18 PM IST

Swara Bhasker Share Baby Bump photos: स्वतःचे आणि पती फहाद अहमदचे काही खास फोटो ट्विटरवर शेअर करताना स्वराने ती लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे.

Swara Bhasker
Swara Bhasker

Swara Bhasker Share Baby Bump photos: प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्करने लग्नाच्या अवघ्या साडेतीन महिन्यांनंतर चाहत्यांना मोठी खुशखबर दिली आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार असून, तिने आपला बेबी बंप दाखवत फोटो शेअर केले आहेत. स्वतःचे आणि पती फहाद अहमदचे काही खास फोटो ट्विटरवर शेअर करताना स्वराने ती लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. फोटोंमध्ये स्वराचा बेबी बंपही दिसत आहे.

आपण आई होणार असल्याची आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर करताना स्वरा भास्करने ट्विटमध्ये लिहिले की, ‘कधीकधी तुमची प्रत्येक प्रार्थना एकाच वेळी ऐकली जाते. आता पूर्णपणे नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी कृतज्ञ आणि उत्साही वाटत आहे.’ या ट्विटद्वारे तिने 'कमिंग सून', ‘फॅमिली’, 'ऑक्टोबर बेबी' असे हॅशटॅग दिले आहेत. म्हणजेच स्वरा भास्कर ऑक्टोबर महिन्यात आई होणार आहे. स्वराच्या आणि फहाद झिरार अहमदच्या आयुष्यात आता एक नवा पाहुणा येणार आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’च्या रिलीज आधीच कलाकार बालाजीच्या चरणी; चित्रपटाच्या यशासाठी घातलं साकडं!

स्वरा भास्कर आणि फहाद झिरार अहमद यांनी १६ फेब्रुवारीला एक व्हिडीओ शेअर करून आपले प्रेम जाहीर केले होते आणि कोर्टात लग्नही केले होते. यानंतर स्वराने मार्चमध्ये दिल्लीत मोठा लग्न सोहळा आयोजित केला होता. यात तिने मेहंदी आणि हळदीसह अनेक विधी आयोजित केले होते. इतकेच नाही, तर फहादने आपल्या गावात वलीमाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अनेक जवळच्या लोकांनी सहभाग घेतला होता.

अभिनेत्री स्वरा भास्करचा पती फहाद अहमद हा राजकारणी आहे आणि समाजवादी पार्टीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे स्वरा आणि फहाद जेव्हा मुंबईत CAA-NRC विरोधात आंदोलन करत होते, तेव्हा एकमेकांच्या जवळ आले. स्वराने स्वतः ही गोष्ट चाहत्यांना सांगितली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले.

IPL_Entry_Point

विभाग