Swara Bhaskar: लग्नाच्या चार महिन्यातच स्वरा भास्कर प्रेग्नंट? काय आहे सत्य
Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्कर प्रेग्नंट असल्याचे एक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र स्वरा खरच प्रेग्नंट आहे का? याबाबत माहिती समोर आली आहे.
देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील रोखठोक भूमिका आणि बेधडक मतांमुळं सातत्यानं चर्चेत असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. आता त्यापाठोपाठ लग्नाच्या चार महिन्यांमध्येच स्वरा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे.
ट्रेंडिंग न्यूज
एका वृत्तवाहिनीने स्वरा भास्कर प्रेग्नंट असल्याची माहिती दिली होती. जुलै महिन्यात ती बाळाला जन्म देणार असल्याचे सांगितले होते. या ट्वीटवर स्वराला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच त्या वृत्तवाहिनीने या सर्व अफवा असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले.
काय होते ट्वीट?
'बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्तर प्रेग्नंट आहे. तिचा पती फवाद अहमदने याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्री जुलै महिन्यात बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे. स्वराने ८ वर्षांनी लहान फवादशी फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधली' या आशयाचे ट्वीट एका वृत्तवाहिनीने केले होते.
सोशल मीडियावर हे ट्वीट तुफान व्हायरल झाले. त्यानंतर काहीच वेळात त्या वृत्तवाहिनीने 'अभिनेत्री स्वरा भास्करशी संबंधीत करण्यात आलेले ट्वीट हे फेक आहे. असे कोणतेही ट्वीट आम्ही केलेले नाही' या आशयाचे ट्वीट केले.
काही दिवसांपूर्वी स्वराने सोशल मीडियावर पोस्ट करत कोर्टात लग्न केल्याची माहिती दिली होती. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. स्वराचा पती फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा राज्याचा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती
विभाग