मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sachin Tendulkar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच शाळा आणि क्रिकेटची सुरुवात, सचिननं जिंकली मनं
sachin tendulkar at janta raja play dadar
sachin tendulkar at janta raja play dadar

Sachin Tendulkar : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच शाळा आणि क्रिकेटची सुरुवात, सचिननं जिंकली मनं

19 March 2023, 13:39 ISTRohit Bibhishan Jetnavare

Sachin Tendulkar speech on chhatrapati shivaji maharaj : दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानात भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी “जाणता राजा” या महानाट्याचे प्रयोग आयोजित केले आहेत. या महानाट्याच्या पहिल्या प्रयोगापासूनच हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतो आहे.

sachin tendulkar at janta raja play dadar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शनिवारी (१८ मार्च) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत जाणता राजा या महानाट्याला हजेरी लावली. मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दादर येथे ‘जाणता राजा’चे प्रयोग आयोजित केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

शनिवारी या महानाट्याचा पाचवा प्रयोग होता. यावेळी सचिनने या प्रयोगाला हजेरी लावली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सचिनने शिवरायांना अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना सचिन म्हणाला की, ‘माझ्या शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धड्याने झाली. त्यानंतर माझ्या क्रिकेटची सुरुवातदेखील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातच झाली’.

सोबतच, छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील जाणता राजा हे महानाट्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. या महानाट्याची अनुभूती घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हटल्याशिवाय राहवत नाही, अशी भावना सचिनने व्यक्त केली. 

जाणता राजा’च्या प्रयोगाची सुरुवात रोज तुळजाभवानीच्या आरतीने होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिली आरती करण्यात आली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गायिका उषा मंगेशकर यांनीही या महानाट्याला हजेरी लावली. आता शनिवारी सचिन तेंडुलकरने या ठिकाणी उपस्थित राहून प्रयोगाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री सना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.