मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : अजित पवारांनी उचललेलं 'ते’ पाऊल चुकीचं; पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांच्या आत्मचरित्रात मोठा खुलासा

Sharad Pawar : अजित पवारांनी उचललेलं 'ते’ पाऊल चुकीचं; पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांच्या आत्मचरित्रात मोठा खुलासा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 02, 2023 12:19 PM IST

Sharad Pawar book Lok Maze Sangati : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जीवनचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगती' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आज प्रकाशन होणार आहे. यात शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भात गौप्यस्फोट केला आहे.

अजित पवार-शरद पवार
अजित पवार-शरद पवार

Sharad Pawar book Lok Maze Sangati : पहाटेच्या शपथविधीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी त्यांच्या 'लोक माझे संगती' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत याबाबत खुलासा केला आहे. 'अजित पवारांनी उचललेलं पाऊल अत्यंत गैर होतं. माझ्या नावाचा वापर करून आमदारांना राजभवनात नेलं, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी या पुस्तकात केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात आता पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, अजित पवार आता यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Karnataka Congress Manifesto : बजरंग दलावर बंदी घालणार! भाजपच्या जाहीरनाम्याला काँग्रेसचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगती' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे आज प्रकाशन होणार आहे. शरद पवार यांचे हे आत्मचरित्रअसून या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन होणार आहे. राज्यात २०१९ पासून अनेक राजकीय उलथापालथी झाल्या असून या सर्व उलथापालथी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दुरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. या सर्व घटनांचे साक्षीदार स्वत: शरद पवार असल्याने पुस्तकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, या पुस्तकाच्या प्रकाशना आधीच याची चर्चा सुरू झाली आहे.

sharad pawar book
sharad pawar book

या पुस्तकात शरद पवार यांनी पहाटेच्या शपथ विधी प्रकरणी अजित पवार यांच्या वागणुकीवर टीका केली आहे. पवार यांनी यावर एक प्रकरण लिहिले असून त्यात 'अजित पवारांनी उचललेलं पाऊल अत्यंत गैर होतं. माझ्या नावाचा वापर करून आमदारांना राजभवनात नेलं असे म्हटले आहे. २३ नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनात पोचलेले असून, आजत पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत,' अशी माहिती मला देण्यात आली. तो मोठा धक्का होता. 'महाविकास आघाडी'चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं. मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं, जेमतेम दहाच आमदार अजितबरोबर गेले आहेत.

Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरात अवकाळी पाऊस; उकाड्यापासून मिळाला दिलासा, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

त्यांच्यापैकीच एक- दोघांशी फोनवर बोलल्यानंतर लक्षात आलं, की हे माझ्या संमतीनंच घडत असल्याची त्यांची समजूत करून देण्यात आली होती. काही मिनिटांतच मी सावरलो. घडलेलं धक्कादायक तर होतंच, परंतु दिशाभूल करून घडवण्यात आलं होतं. ‘महाविकास आघाडीचा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपनं केलेला हा रडीचा डाव होता.

यातून राजकीय कंड्या पिकण्याआधी, हा गोंधळ निस्तरणं आवश्यक होतं. मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. ‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही,' असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं, असं पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.

शरद पवार यांच्या या गौप्यस्फोटांमुळे आता अजित पवार काय प्रतिक्रिया देतात या कडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. आधीच अजित पावर हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच येत्या काही दिवसांत सत्ता बदल होईल असे देखील बोलल्या जात आहे. त्यात आता शरद पवार यांनी केलेल्या या गौप्यस्फोटाचे राज्याच्या राजकारणावर काय परिमाण होणार आता हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग