मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरात अवकाळी पाऊस; उकाड्यापासून मिळाला दिलासा, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

Mumbai Rain : मुंबईच्या पश्चिम उपनगरात अवकाळी पाऊस; उकाड्यापासून मिळाला दिलासा, हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 02, 2023 10:41 AM IST

Mumbai Rain update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. सकाळी ९ च्या सुमारास सुरू झालेल्या संततधारेने ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची चांगलीचे त्रेधा उडालेली पाहायला मिळत होती.

Mumbai Rain update
Mumbai Rain update (PTI)

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. सकाळी ९ च्या सुमारास सुरू झालेल्या संततधारेने ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांची चांगलीचे त्रेधा उडालेली पाहायला मिळत होती. सकाळी ९ची वेळ ही अत्यंत महत्वाची वेळ असते आणि प्रत्येकजण ऑफिसला पोहोचण्याच्या लगबगीत असतो आणि मे महिना मुंबईसह महाराष्ट आणि देशात उकाड्याचा महिना असल्याने छत्र्या माळ्यावर पाहायला मिळतात. अशात अचानक आलेल्या या पावसाने चांगलीच धावपळ उडालेली पाहायला मिळाली.

ट्रेंडिंग न्यूज

Tillu Tajpuria Murder: तिहार जेलमध्ये पुन्हा टोळीयुद्ध, कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरियाची कारागृहात हत्या

या पावसामुळे वाढत्या उकड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला. पुढच्या काही तासात मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Windfall Tax : कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्समध्ये कपात; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

आज पहाटेपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण आहे. मुंबईच्या उपनगरांमध्ये काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. पुढच्या २४ तासात मुंबईत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होणीची शक्यता आहे.

मुंबईच्या उपगरांसह, पुणे, कोकण, गोव्यात अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी आणि योग्य ठिकाणी धनी साठवावे असे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात धुवांधार पाऊस होण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यात कमाल तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

IPL_Entry_Point